शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकऱ्याच्या थडग्यावर विकासाची मनोरे उभारू नका : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 16:49 IST

समुध्दी महार्गातील बाधित शेतकऱ्यांना वेगळा आणि सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांना वेगळा निधी का ?

- नितीन कांबळे कडा ( बीड) : विकास होऊ द्या, आमचा विरोध नाही. पण आमच्या अन्नात माती कालवू नका. तुम्ही राज्यभर विकासाचे मनोरे बांधा पण त्याखाली आम्हा शेतकऱ्यांची थडगी गाडली जाऊ नयेत, अशी टोकदार भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली. ते कडा येथील शेतकरी आक्रोश मेळाव्यात मार्गदर्शनपर बोलत होते.

सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या आक्रोश मेळाव्याचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कडा येथे करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, अहमदनगर जिल्हाध्यक्ष लोंढे, रवि मोरे, मंगेश आजबे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना शेट्टी म्हणाले की, पिढ्यानपिढ्या सांभाळलेली जमीन सानाडीत करताना डोक्यावर पाणी आणून जगवलेली झाडे, पाईपलाईन, विहिर, घर याचा देखील विचार करावा. पण याकडे ते दुर्लक्ष करीत असतील तर त्यांची जागा त्यांना दाखवून दिली जाईल. सुसाट वेग असणाऱ्यांसाठी रस्ता आहे. शेतकऱ्यांनी विमान घ्यावे का? आमच्या प्रश्नाची उत्तरे आम्हाला मिळावीत. नवे महामार्ग शेतमाल, जानेयेण्यास अडचणीचे ठरू नयेत. या गोष्टी एकदा तपासून घ्याव्या लागतील. जमीन, झाडे, पाईपलाईन यांची आधी किमत सांगा, मग आम्ही निर्णय घेऊ. जर कोणी सरकारी माणूस दारात आला तर त्याला चोरासारखी वागणूक द्या. पाच जिल्हातील शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा. तुम्ही सगळे एकत्रीत आला तर सरकारला तुमच्या समोर  गुडघे टेकायला लाऊ, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. 

निधीत असा भेदभाव का?समुध्दी महार्गातील बाधित शेतकऱ्यांना वेगळा आणि सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांना वेगळा निधी का ? सगळा पैसा अदानी अंबानीच्या घरात जायला पाहिजे. आम्ही शेतकरी  उपाशी राहायला पाहिजे हे सरकारचे धोरण आहे का, असा आरोपही शेट्टी यांनी केला .

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टीBeedबीड