शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानासाठी दात्यांनो, पुढे या !; बीड जिल्हा रुग्णालयाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:08 IST

‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णलयाच्या वतीने करण्यात आले आहे.

बीड : जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्तदानासाठी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांनी पुढाकार घेत रक्त संकलनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णलयाच्या वतीने करण्यात आले आहे.

रक्तसंकलनात बीड जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी राज्यात प्रथम क्रमाकांवर आहे. हे सर्व यश जिल्ह्यातील रक्तदात्यांमुळेच शक्य झाले असे गौरवोद्गार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी काढले होते. यामुळे रक्तपेढीत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह आणखीनच वाढला. संघटना, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालय, संस्था यांना भेटी देण्याबरोबरच त्यांच्याशी चर्चा करुन रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शेकडो दात्यांनी पुढे येऊन रक्तदान केले. त्यामुळेच आज जिल्हा रुग्णालयाची मान रक्तसंकलनामुळे उंचावली आहे.

आता पुन्हा एकदा सर्वांनी पुढे येऊन जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत जास्तीत जास्त रक्त संकलन करण्यासाठी रक्तदान करण्याची गरज आहे. तसे आवाहनही जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो असे म्हणत रक्तदान करण्याची गरज आहे.

दात्यांनी पुढे यावे रुग्णांचे हाल होणार नाहीत, त्यांना अडचण येणार नाही यासाठी आम्ही तत्पर असतो. रक्तसंकलनात जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी अव्वल आहे. दाते आणि रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे यश आहे. आतापर्यंत दात्यांच्या पुढाकारामुळेच रक्तपेढीने यशाचे उंच शिखर गाठले आहे. आता पुन्हा एकदा दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे. - डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडHealthआरोग्यdoctorडॉक्टर