बीड: हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर केला जात असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर बीड शहरातील तीन हॉटेलवर छापा टाकून चार टाक्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई बीड तहसील कार्यालयाच्यावतीने बुधवारी सांयकाळी करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत संबंधित हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिवाजी नगर पोलिस ठाण्यात सुरु होती.
अमेरिका-इस्त्रायल व इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचे वितरण बंद झाले आहे. असे असताना बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील श्री हॉटेल, समाधान हॉटेल व रायगड हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात असल्याची माहिती बीड तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार संबंधित तिन्ही हॉटेलवर बुधवारी दुपारी छापा टाकला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना या हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडर आढळून आले. सदरील सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. तसेच संबंधित हॉटेल चालकाविरुद्ध रात्री उशीरापर्यंत संबंधित हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिवाजी नगर पोलिस ठाण्यात सुरु होती. ही कारवाई तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर, मंडळ अधिकारी अनिल तांदळे, तलाठी शब्बीर पठाण, तालुका पुरवठा विभागातील अव्वल कारकून श्रीराम वैभव आणि संतोष मुळीक यांनी केली.
Web Summary : Beed authorities raided three hotels, seizing four domestic gas cylinders used for commercial purposes. The action followed information about illegal usage amidst commercial gas distribution issues. Police are filing charges against the hotel owners at Shivaji Nagar police station.
Web Summary : बीड में तीन होटलों पर छापा मारकर व्यावसायिक उद्देश्यों के लिए उपयोग किए जा रहे चार घरेलू गैस सिलेंडर जब्त किए गए। यह कार्रवाई वाणिज्यिक गैस वितरण के मुद्दों के बीच अवैध उपयोग की जानकारी के बाद की गई। शिवाजी नगर पुलिस स्टेशन में होटल मालिकों के खिलाफ मामला दर्ज किया जा रहा है।