शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी देता का पाणी...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:42 IST

जालना : तालुक्यातील पुणेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावात पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. गावात पाणी ...

ठळक मुद्देपुणेगाव : हंडा आंदोलन, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

जालना : तालुक्यातील पुणेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावात पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. गावात पाणी उपलब्ध असतांनाही येथील ग्रामसेवक पाणी सोडत नाही. आम्हाला पाणी द्या, या मागणी पुणेगाव येथील महिलांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले.जालना तालुक्यातील पुणेगावात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयला अनेक वेळा सांगण्यात आले. परंतु, ग्रामपंचायत कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, गावात विहिर अधिग्रहणाची गरज असतांनाही प्रशासनाने विहिर अधिग्रहण केले नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. येत्या २४ तासात पाण्याची व्यवस्था केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा परिषद कार्यालय परिसरात महिलांनी हंडा घेवून प्रशासनाचा विरोध केला. यावेळी कारभारी अंभोरे, विमल हाके, सखुबाई करपे, रेखा घुगे, गंगुबाई उगले, कमलबाई जारकड, द्वारका भारकड, शकुंतलाबाई चोरमारे, सुमिनाबाई चोरमारे, केसरबाई चोरमारे यांच्यासह २५ ते ३० महिलांची उपस्थिती होती.सीईओंच्या कार्यालयासमोर गोंधळग्रामस्थांनी विविध मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना दिले.निवेदन देतावेळी ग्रामसेवकांनी गावात दररोज पाणी सोडण्यात येत नससल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी सीईओंच्या कार्यालयाजवळ गोंधळ केला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन ग्रामस्थांना शांत केले.अध्यक्षांनी केली मध्यस्थीग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या कार्यालयासमोर गोंधळ केला होता. त्यानंतर जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी महिलांना कार्यालयात बोलवून पाणी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी सीईओंना बोलवून तात्काळ टँकर सुरु करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी संतप्त महिलांनी आपल्या व्यथा अध्यक्षांसमोर मांडल्या.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन