शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल शॉपमधील आगीत होरपळून डॉक्टरांचा मृत्यू; कंपाउंडर गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:24 IST

गेवराई तालुक्यातील तलवाडा फाटा येथील घटना

गेवराई : तालुक्यातील तलवाडा फाटा येथील एका मेडिकल शॉपला लागलेल्या आगीत होरपळून डॉक्टरांचामृत्यू झाला असून कंपाउंडर  गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री २ वाजेच्या दरम्यान झाली असून आगीमुळे मेडिकल शॉप जळुन खाक झाले आहे. डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले असे मृत डॉक्टरांचे नाव आहे. 

बागपिंपळगाव येथील डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा तलवाडा फाटा येथे एका इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर दवाखाना आहे. दवाखान्या शेजारीच मेडिकल शॉप आहे.  रविवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास येथील मेडिकल शॉपला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. यावेळी मेडिकल शॉपमध्ये डॉ. चोरमले आणि कंपाउंडर सुनील माळी हे गंभीर जखमी अवस्थेत तेथे आढळून आले. पोलिसांनी लागलीच त्यांना उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात रवाना केले. मात्र डॉ. चोरमले यांचा रस्त्यामध्येच मृत्यू झाला. तर कंपाउंडर माळी यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

भीषण आगीमुळे फ्रीजचा स्फोट झाल्याने मेडिकल शॉप जळून खाक झाले आहे. या स्फोटामध्येच होरपळून डॉक्टर चोरमले आणि कंपाउंडर माळी गंभीर जखमी झाल्याचा अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम चौबे, पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, पोलिस गणेश तळेकर यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडdoctorडॉक्टर