शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

सरकारी दवाखान्यात खासगी डॉक्टर पैसे घेऊन करतात प्रसूती? तक्रारदारांवर दबावाचा प्रयत्न

By सोमनाथ खताळ | Updated: August 23, 2022 12:14 IST

कुटुंबकल्याण शस्त्रक्रियासाठी आलेल्या महिलांची बाहेरून तपासणी करण्यास सांगून पैसे घेतले होते.

बीड : सामान्यांना मोफत उपचार देणाऱ्या सरकारी दवाखान्यातच लूट सुरू झाली आहे. खासगी डॉक्टरांना बोलावून घेत पैसे देऊन प्रसूती केली जात असल्याचा प्रकार वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दुपारी घडला. याप्रकरणात नातेवाइकांनी अगोदर नगराध्यक्ष पती शेषेराव जगताप यांना सांगितले. त्यांनी डीएचओकडे तोंडी तक्रार केली. परंतु, कारवाईची टांगती तलवार दिसताच डॉक्टरांनी सारवासारव करत नातेवाइकांवर दबाव आणत हे प्रकरण दडपल्याचा आरोपही जगताप यांनी केला. दरम्यान, यापूर्वीही असे अनेकदा घडल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

वडवणी आराेग्य केंद्र यापूर्वीही वादात सापडले होते. कुटुंबकल्याण शस्त्रक्रियासाठी आलेल्या महिलांची बाहेरून तपासणी करण्यास सांगून पैसे घेतले होते. हे प्रकरण लक्षात येताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी वडवणीत धाव घेतली. सर्वांचे पैसे परत देण्यात आले. तसेच यापुढे असे प्रकार केल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. हे प्रकरण विसरत नाही तोच पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. वडवणीपासून जवळच असलेल्या मैंदा येथील एका २० वर्षीय महिलेला प्रसूतीसाठी रविवारी सकाळी ६ वाजता आरोग्य केंद्रात दाखल केले. दुपारी १२.४६ मिनिटांनी या महिलेनी मुलीला जन्म दिला. परंतु, ही प्रसूती करण्यासाठी शहरातीलच एका ‘बड्या’ डॉक्टरला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी रुग्णांकडे पैशांची मागणीही केली. परंतु, परिस्थिती हलाखीची असल्याने या रुग्णाच्या नातेवाइकांनी नगराध्यक्ष पती शेषेराव जगताप यांना प्रकार सांगितला. त्यांनी डीएचओ डॉ. गिते यांना कळविले. यात आपला भांडाफोड होणार या भीतीने डॉक्टरांनी नातेवाइकांवर दबाव आणला. त्यामुळे आता ते भीतीपोटी बोलत नसल्याचे जगताप यांनी सांगितले. तर दुसऱ्या बाजूला लेखी तक्रार नसल्याचे कारण देत आरोग्य विभागही हातावर हात देऊन बसल्याचे दिसत आहे. नातेवाईक जरी शांत असले तरी याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून हाेत आहे.

अधिकारी काय म्हणतात...जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते म्हणाले, मला कॉल आला होता. मी आमच्या टीएचओंना खात्री करण्यास सांगितले होते. त्यांनी चौकशी केली असता प्राथमिकदृष्ट्या तसे काही नाही, असे दिसते. परंतु, तक्रार आल्यास चौकशी केली जाईल. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे म्हणाले, मी प्राथमिक चौकशी केली असता तसे काही वाटत नाही. आणखी चौकशी सुरूच आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब तांदळे व डॉ. अरुण मोराळे म्हणाले, असा काहीही प्रकार नाही. प्रसूती आम्हीच केली आहे. खासगी डॉक्टर कोणीही आले नव्हते, असे सांगितले.

दबाव आणला जात आहे हा प्रकार खरा असून डीएचओंनाही बोललो आहेत. आता नातेवाइकांवर दबाव आणला जात आहे, त्यामुळे ते घाबरले आहेत. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. रुग्ण कल्याण समितीची बैठक घेऊन निधीचा उपयोग रुग्णांच्या सेवा, सुविधांसाठीच करा, असे सांगितले होते. परंतु, लगेच असे घडले. आता यापुढे असे होऊ नये, यासाठी बारीक लक्ष ठेवू. मी बोललो हीच तक्रार समजावी.-शेषेराव जगताप, नगराध्यक्ष पती, वडवणी.

टॅग्स :doctorडॉक्टरBeedबीडHealthआरोग्य