शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रेडीरेकनरमध्ये वाढ नको; सामान्यांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी विकासकांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:47 IST

बांधकाम तसेच इतर क्षेत्रात मंदी असल्याने आगामी आर्थिक वर्षात रेडीरेकनर रेटमध्ये वाढ न करता सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी बांधकाम व्यावासायिक आणि विकासकांच्या जिल्हा क्रेडई संघटनेने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना २०२२ पर्यंत घरे उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने बºयाच सवलती देऊकेल्या आहेत. त्यामुळे बाजारमूल्य दर वाढविल्यास यात मोठा अडसर ठरेल असे जिल्हा क्रेडईचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बांधकाम तसेच इतर क्षेत्रात मंदी असल्याने आगामी आर्थिक वर्षात रेडीरेकनर रेटमध्ये वाढ न करता सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी बांधकाम व्यावासायिक आणि विकासकांच्या जिल्हा क्रेडई संघटनेने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना २०२२ पर्यंत घरे उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने बºयाच सवलती देऊकेल्या आहेत. त्यामुळे बाजारमूल्य दर वाढविल्यास यात मोठा अडसर ठरेल असे जिल्हा क्रेडईचे म्हणणे आहे.

दरवर्षी अशास्त्रीय पद्धतीने वाढणाºया रेडीरेकनर दरासंदर्भात निर्णय होऊन १ एप्रिलपासून लागू केले जातात. त्याचा सगळेच जण धसका घेतात. बाजारमूल्य दर निश्चित करताना कोणतीही शास्त्रीय कार्यपद्धती न वापरता अवाजवी दरवाढ केली जाते. हे दर ठरविण्यासाठी शासनाकडून लाभार्थींची मते मागितली जात नाहीत. त्यामुळे बाजारमूल्य तक्त्याचे दर अंतीम करण्याआधी सर्व लाभार्थी घटकांकडून सूचना मागवून विचारविनिमय करून दरवाढ करावी असे क्रेडईची मागणी आहे.

अनेक ठिकाणी बाजारमूल्य दर आवाजवी असल्याने तेथील जागेचे, फ्लॅटचे दर कमी करणे गरजेचे असल्याचे विकासकांचे मत आहे.मागील सात वर्षांतील रेडीरेकनरचा आढावा पाहता दरवर्षी रसरी २० ते ३० टक्के दर हे सर्वसामान्य विभागात वाढविण्यात येतात. त्यामुळे े रेडीरेकनरचे दर तिप्पट झालेले आहेत. उलट बाजारभावामध्ये मागील चार वर्षात अजिबात वाढ झाली नसून बाजारभाव बहुसंख्य ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी बाजारमूल्य दर हे कमी झाल्याचे दिसून येते. हा विषय सामान्य नागरिकांच्या घरांच्या गरजेशी निगडित असून महत्वाचा असल्याने शासनाने विचार करावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात जिल्हा क्रेडईने म्हटले आहे.रेडीरेकनरमध्ये पारदर्शकतेची गरजरेडीरेकनरच्या दरवाढीसोबत त्यासोबतच्या स्थळ टिपांमध्येही वाढ केली जाते. मागील सात वर्षात स्थळ टिपांचा वापर दर वाढविण्याठी केला जातो. यात पारदर्शकतेची गरज आहे. यात फेररचनेची गरज आहे.८ नोव्हेंबर २०१६ पासून बांधकाम क्षेत्रात मंदीची लाट आहे. त्यामुळे बीड शहरातील रिअल इस्टेटसह बांधकामांच्या व्यवहारावर मोठा परिणाम झालेला आहे. हीच परिस्थिती सर्वत्र आहे.बीडमध्ये न. प. मार्फत गुंठेवारीसाठी रेडीरेकनरच्या दराने आकारणी सुरु आहे. त्यामुळे रेडीरेकनरच्या दरात वाढ झाली तर सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न दूर राहील. शासनाने विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.जीएसटीमुळे अतिरिक्त बोजाजीएसटी लागू होण्याआधी ५.३५ टक्के कर घरांवर भरावा लागत होता. आता या ग्राहकांना १२ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. तसेच जीएसटीनंतर एलबीसी बंद झालेले नाही. ग्राहकाची क्रयशक्ती वाढत नसल्याने या करांचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडत आहे. त्यात अनेक ठिकाणी मुद्रांक शुल्क दर एक टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.- वैभव क्षीरसागर