शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोफत फराळ वाटपातून दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:06 IST

येथील राजयोग फाऊंडेशन व रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांची विशेष उपस्थिती होती.

ठळक मुद्देवंचितांची दिवाळी : बीडमध्ये राजयोग फाऊंडेशन, रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनचा तीन वर्षांपासून उपक्रम, लाभार्थ्यांचे चेहरे फुलले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील राजयोग फाऊंडेशन व रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर पर्यटन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप धूत, रोटरीचे डीजीएन हरिष मोटवाणी, सामाजिक कार्यकर्ते बंडू कदम, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बजाज, सचिव अभिजीत ठाकूर , राजयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शुभम धूत आदी उपस्थित होते.यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी आशीर्वचन दिले. त्यानंतर दोन हजार कुटुंबांच्या प्रतिनिधींना मोफत दिवाळी फराळ व अभ्यंगस्नानाचे साहित्य तसेच पणत्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम धूत म्हणाले, रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनने सुरु केलेल्या मोफत फराळ वाटप उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा होती. तीन वर्षांपासून राजयोग व रोटरीच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीरित्या सुरु आहे. दीनदुबळ्या, गरजू व गरिबांना फराळाचे वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आम्हा आयोजकांना वेगळाच आत्मानंद होतो. त्यांचे आशीर्वाद लाखमोलाचे असतात. हा उपक्रम दरवर्षी राबविला जाणार असल्याचे धूत म्हणाले.रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष सुरेंद्र बजाज म्हणाले, या उपक्रमासाठी राजयोग सारख्या सामाजिक संघटना आम्हाला पाठबळ देत आहेत. त्यामुळे या मोफत फराळ वाटपाचे स्वरूप वाढले आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणखी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. शुभम धूत यांच्या दातृत्वामुळे आमच्या क्लबमधील सदस्यांनी खंबीर साथ देत यावेळी दोन हजार कुटुंबीय तसेच वर्तमानपत्र क्षेत्रात रात्रपाळीत काम करणाºया कामगारांना फराळ वाटपाचा संकल्प सिद्धीस नेला. प्रास्ताविक सूर्यकांत महाजन, सूत्रसंचालन नितीन गोपन यांनी केले. अभिजितसिंह ठाकूर यांनी आभार मानले.या उपक्रमासाठी रोटरी मिडटाऊनचे सदस्य व राजयोग फाउंडेशनच्या सदस्यांनी मागील दीड महिन्यापासून अथक परिश्रम घेतले.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिक