शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचे अनुदान फक्त 10 टक्के वाटप; प्रशासकीय पातळीवर संथ कामाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:23 IST

जिल्ह्यातील ४५ हजारांवर शेतकऱ्यांना १५३ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये इतका निधी नुकसान भरपाईपोटी मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, तात्काळ वाटपाची मागणी

बीड  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात १५३ कोटी ३७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, याचे वितरण धीम्या गतीने सुरू असून, फक्त ९.४९ टक्के मदतीचे वितरण करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील ४५ हजारांवर शेतकऱ्यांना १५३ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये इतका निधी नुकसान भरपाईपोटी मंजूर झाला आहे. ही पहिल्या टप्प्यातील रक्कम दिवाळीपूर्वी वाटप करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, तसे झाले नाही. यापैकी फक्त १४ कोटी ५५ लाख ८६ हजार रुपये इतका निधी बँकेत जमा झाला आहे. अद्याप एक रुपयादेखील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेला नाही.

नुकसान झाल्यानंतर प्रतिहेक्टर (दोन हेक्टरच्या मर्यादेत) कोरडवाहूसाठी हेक्टरी १० हजार, तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी २५ हजार रुपयांची घोषणा शासनाने केली होती. सोयाबीन व कापसाचे मोठे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत होती. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी बांधावर जाऊन पाहणी केली होती. दरम्यान, कृषी विभागाने दोन वेळा पंचनामे करून दिल्यानंतर जिल्ह्यातील ४५ हजार ६८४ शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

या नुकसान भरपाईपोटी जवळपास ३०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५३ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये इतका निधी प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, यापैकी केवळ १४ कोटी ५५ लाख ८६ हजार रुपये इतकेच अनुदान बँकेच्या खात्यात जमा झाले आहे. मदत वाटपाची टक्केवारी केवळ ९.४९ आहे. उर्वरित शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालत प्रशासनाला गतिमान करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

जिल्हा प्रशासन गंभीर नाहीशेतकरी झालेल्या नुकसानीमुळे मरणयातना भोगत आहेत. यातच नुकसान भरपाईची रक्कम आधार होईल, असे वाटत होते. मात्र, जिल्हा प्रशासन अनुदान वाटपाच्या संदर्भात गंभीर नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक होणार असून, पुढील ८ दिवसांत अनुदान शेतकऱ्यांच्या हातात मिळाले नाही तर जिल्हाभरात आंदोलन करू, असा इशारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.

बँकेत पैसे राहतात पडूनबँकेत नुकसान भरपाई किंवा अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आल्यानंतर तात्काळ वाटप केले जात नाही. त्यामुळे अनुदान वर्ग करून देखील फायदा होत नाही. दीड ते दोन महिने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया देखील तात्काळ राबवून थेट शेतकऱ्याच्या बँकेतील खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीagricultureशेती