शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मटणाच्या वाटणीवरून वाद; डोक्यात मारला गावठी कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:48 IST

धुलीवंदनानिमित्त मटणाची पार्टी करण्यासाठी मित्रांनी बोकड आणले. परंतु, एका त्रयस्थ मद्यपीने दमदाटी करून मटणात वाटा मागितला.

कडा : धुलीवंदनानिमित्त मटणाची पार्टी करण्यासाठी मित्रांनी बोकड आणले. परंतु, एका त्रयस्थ मद्यपीने दमदाटी करून मटणात वाटा मागितला. मटन दिल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने चिडलेल्या मद्यपीने गावठी कट्टा काढत एकाच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी सकाळी आष्टी तालुक्यातील हातवण येथे घडली.गुरुवारी धुलीवंदन असल्याने हातवण येथील महेंद्र शंकर कोरडे आणि त्यांचे मित्र दस्तगीर चाँद सय्यद, गोरख निवृत्ती काळोखे आणि इतर मित्रांनी मटणासाठी बोकड आणले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास दस्तगीर यांच्या घराशेजारी या मित्रांनी ते बोकड कापले. त्यानंतर मटणाचे हिस्से करत असताना तिथे जनार्दन बेरड (रा. तरडगव्हाण, जि. अहमदनगर) हा मद्यपी मटण घेण्यासाठी आला. सध्या मटण वाटपाची यादी तयार झाली असून उरले तर तुला देऊ, असे सांगताच जनार्दनने आरडाओरडा करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरडे आणि त्यांच्या मित्रांनी जनार्दनला एक किलो मटन दिले आणि बदल्यात साडेचारशे रुपये मागितले. याचा राग आल्याने जनार्दनने स्वत:जवळील गावठी कट्टा काढला आणि कोरडे यांच्या डोक्यात मारला. यावेळी त्या कट्ट््यातून एक काडतूस देखील खाली पडली. कट्टा जोरात लागल्याने कोरडे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यानंतर कोरडे यांच्या मित्रांनी मध्यस्थी करत जनार्दनला रोखले आणि मारहाण करत पिटाळून लावले. याप्रकरणी कोरडे यांच्या फिर्यादीवरून जनार्दनवर अंभोरा पोलिसात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी