शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही एकाच छताखाली राहतो; पण एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 11:03 IST

आमदार संदीप व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरगुती वादावर योगेश क्षीरसागरांकडून खुलासा

- सोमनाथ खताळबीड : आम्ही स्व.केशरबाई क्षीरसागर यांचे वारसदार आहोत. आमचे वडील ३५ वर्षे नगराध्यक्ष राहिले; पण कधी कोणाला अपशब्द बोलत नाहीत. आमदारांना कोण मुर्खपणाचा सल्ला देतंय काय माहिती. आम्ही एका घरात, एका छताखाली राहतो; पण एकमेकांचे तोंडही पहात नाही, असे सांगत माजी नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आपल्या घरातील वादावर खुलासा केला. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ.संदीप क्षीरसागर हे राजकीय विरोधक असूनही एकाच छताखाली राहतात तरी कसे? या चर्चेला आता उत्तर मिळाले आहे.

राजकारणात काका-पुतण्या, बहीण-भाऊ, भाऊ-भाऊ असे विरोधक आहेत. बीडमध्ये मुंडे भाऊ-बहिणीच्या आरोप-प्रत्यारोपांची चर्चा राज्यभर होते. आता त्यांच्यापाठोपाठ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ.संदीप क्षीरसागर यांचा क्रमांक लागला. विधानसभा निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभूत करून संदीप क्षीरसागरांनी आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेतली. तेव्हापासून या घरात राजकीय विरोध सुरू झाला. नंतर नगरपालिका निवडणुकीतही आ.संदीप यांनी बाजी मारली; परंतु त्यांना ती टिकवून ठेवता आली नाही. आमदारांचेच काका डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पाच सदस्यांना आपल्या जाळ्यात ओढून पालिकेवर सत्ता मिळवली. त्यानंतर पालिकेतही वाद सुरू झाले आहे. आता काही दिवसांवर पालिका निवडणुका आल्या आहेत. राज्यात जरी महाविकास आघाडी सरकार असले तरी बीडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीत बिघाडी आहे. याच बिघाडीतून २५ फेब्रुवारी रोजी मुद्रांक कार्यालयात गोळीबार झाला. यात आमदारांचे वडील व दोन बंधू आणि माजी नगराध्यक्ष व त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला.

यामुळे शहरात राजकीय तणाव निर्माण झाला होता. हे कट्टर विरोधक एकाच छताखाली कसे रहात असतील, असा सवाल कार्यकर्त्याच्या मनात होता. याच अनुषंगाने गुरुवारी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागरांना हा प्रश्न विचारला. यावर त्यांनी या वादावर खुलासा करत आपण एका छताखाली रहात असलो तरी एकमेकांचे तोंडही पाहत नसल्याचे सांगितले. त्यामुळे बाहेर जो राजकीय वाद आहे, तोच घरातही असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

लहान मुलांचा असतो वावरएका छताखाली रहात असलो तरी सुख-दुखा:त एकमेकांच्या सोबत आहोत. सणावाराला लहान मुले, महिलांचे ये-जा होतच असते; परंतु आम्ही कधी एकमेकांना बोलायचे तर लांबच; परंतु तोंडही पाहत नाहीत. कधी येता-जाता क्रॉसिंग होते; पण आम्ही कधीच बोलत नाहीत, असेही डॉ. याेगेश क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरPoliticsराजकारण