शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजार की बाजार? गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार पुन्हा वाढले; पाच वर्षांत ४,७१४ शस्त्रक्रिया

By सोमनाथ खताळ | Updated: December 30, 2023 07:58 IST

अवघ्या २३व्या वर्षीही काढली पिशवी

सोमनाथ खताळ,  लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील ४ हजार ७१४ महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील अडीच हजार पिशव्या या खासगी रुग्णालयात काढल्या आहेत. धक्कादायक म्हणजे अवघ्या २३ वय असलेल्या एका विवाहितेचीही शस्त्रक्रिया झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

२०१६ ते २०१८ या तीनच वर्षांत १०१ खासगी रुग्णालयांत तब्बल चार हजार ६०५ महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या होत्या.  २०२० व २०२१ ला शस्त्रक्रियांचा आकडा निम्म्यावर आला. मात्र, दुर्लक्ष झाल्यामुळे २०२२मध्ये हा आकडा एक हजाराच्या वर पोहोचला आहे.  ५५ टक्के खासगी रुग्णालये, ४४ टक्केशासकीय रुग्णालये.

‘लोकमत’मुळे प्रकरण उजेडात

‘लोकमत’ने हे प्रकरण उजेडात आणले. त्यानंतर २६ जून २०१९ ला चौकशीसाठी डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. सर्व महिलांशी संवाद, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समितीने २७ ऑगस्ट २०१९ ला शासनाला अहवाल देत मार्गदर्शक सूचना सुचविल्या होत्या. 

गर्भपिशवीला गाठ असणे, मासिक पाळीत जास्त दिवस जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, पिशवीच्या आतील भागाची अनियंत्रित वाढ होणे, पिशवी किंवा मुखाचा कॅन्सर  या कारणांनी शस्त्रक्रिया केली जाते. याचे प्रमाण २५ ते ३०% असू शकते. सर्वांनाच शस्त्रक्रियेची गरज नाही. - डॉ. अशोक बडे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड 

टॅग्स :Healthआरोग्य