रस्ते दुरूस्तीचा अडथळा
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. कामे करण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे होत आहेत. खड्डे चुकविताना लहान-मोठ्या अपघातांत वाढ झाली आहे.
पुलांचे कठडे गायब
आष्टी : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाईप तोडून भंगारमध्ये नेऊन विकले. त्यामुळे पुलाचे कठडे गायब झाले आहेत.
पथदिवे बंद
माजलगाव : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक खेड्यांमध्ये अघोषित भारनियमन सुरूच आहे. यामुळे नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात असणारे बहुतांश पथदिवे बंद स्थितीत राहतात. परिणामी चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
बेफिकिरी वाढली
अंबाजोगाई : विनामास्क प्रवाशांनाही अॅटो रिक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. पूर्वी मास्क असल्याशिवाय रिक्षाचालक प्रवाशांना अथवा ग्राहकांना रिक्षात बसू देत नव्हते. मात्र, आता बेफिकिरी वाढत चालली आहे.