अंबाजोगाई : भावजय घरात एकटीच असल्याची संधी साधून दिराने तिचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.३०) सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणा येथे उघडकीस आली. याप्रकरणी दिरावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. कुटुंबातील सर्व सदस्य आपापल्या कामानिमित्त घराबाहेर गेले असल्याने बुधवारी सकाळी ८ वाजता ४५ वर्षीय पीडिता घरात एकटीच होती. यावेळी तिचा दिर (रा. सोनवळा, ता. धारूर) घरात आला. तुम्हाला तुरुंगात टाकले तरी तुम्ही गावातील घर का सोडत नाहीत असे म्हणत त्याने पिडीतेचा विनयभंग केला. घाबरलेल्या पिडीतेचा आरडाओरडा ऐकून तिच्या पतीने घराकडे धाव घेतली. त्यांना पाहताच दिराने पळ काढला असे पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी दिरावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी गायकवाड करत आहेत.
दिराने केला भावजयीचा विनयभंग; अंबाजोगाई तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 19:26 IST
घरात एकटीच असल्याची संधी साधून केला विनयभंग
दिराने केला भावजयीचा विनयभंग; अंबाजोगाई तालुक्यातील घटना
ठळक मुद्देयाप्रकरणी दिरावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.