शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘डायलेसिस’मुळे २५६० रूग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:41 IST

विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरू पहात आहे. जिल्हा रूग्णालयात आतापर्यंत २ हजार ५६० रूग्णांना या डायलेसिसमुळे जीवदान मिळाले आहे. अपुरे मनुष्यबळ आणि अपुऱ्या यंत्र सामग्रीवरही डायलेसिस विभागाचे काम मराठवाड्यात अव्वल आहे

ठळक मुद्देबीड जिल्हा रूग्णालय; किडनी निकामी ठरल्यानंतर डायलेसिस हा पर्याय उत्तम

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरू पहात आहे. जिल्हा रूग्णालयात आतापर्यंत २ हजार ५६० रूग्णांना या डायलेसिसमुळे जीवदान मिळाले आहे. अपुरे मनुष्यबळ आणि अपुऱ्या यंत्र सामग्रीवरही डायलेसिस विभागाचे काम मराठवाड्यात अव्वल आहे.साप चावलेले, मधुमेह, लठ्ठपणा, जळालेले, विष प्राशन केलेले, विविध अपघातांत जखमी झालेले या सारख्या विविध कारणांमुळे मनुष्याच्या किरण्या निकामी होतात. किडनीचा विकार बळावल्यानंतर त्याच्यावर होणारे सर्व उपचार जेव्हा निष्क्रिय ठरतात आणि किडनी निकामी होते. त्या वेळी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कार्य कोणीतरी करणे आवश्यक असते. त्यासाठी डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरतो.डायलेसिस मशीनद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. किडनीसारखेच कृत्रिमरीत्या हे मशीन काम करते. त्यामुळे रक्तातील क्रिएटिन, युरियासारखे विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीरातले जास्तीचे पाणी बाहेर काढले जाते. शरीरातील क्षारांचे प्रमाण हे मशीन नियंत्रणात ठेवते. डायलेसिसची सुरुवात तेव्हाच होते, जेव्हा किडनी पूर्णत: निकामी होते.या विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरीदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मनोज मुंडे, प्रमुख स्वाती माळी, परिचारीका उज्वला खिल्लारे, टेक्निशियन किशोर धुणगव, वसंत घुले, प्रीती कुलकर्णी, सेवक माने हे काम करतात.१२ ते ८० वर्षापर्यंतचे रूग्ण घेतात उपचार१२ ते ८० वर्षापर्यंतचे रूग्ण या विभागात उपचार घेतात. आठवड्यातून दोन वेळा डायलेसिस करण्यासह त्यांचे रक्त तपासणी करणे, रक्त बदलन्याचे काम केले जाते. तसेच कुटुंबियांनी रूग्णाला मानसिक आधार देणे हे प्रामुख्याने गरजेचे आहे. रूग्ण जेव्हा सकारात्मक दृष्टीने पाहतो, त्यावेळी त्याच्यावरील उपचारांना अत्यंत चांगला प्रतिसाद देतो.सर्वसामान्यांचा आर्थिक खर्चही वाचलाजिल्हा रूग्णालयात हा विभाग स्थापन झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी आर्थिक झळ कमी झाली आहे. खाजगी रूग्णालयात एकावेळी डायलेसिस करण्यासाठी किमान तीन ते चार हजार रूपये लागतात, असे सांगण्यात आले.विभागात आलेल्या प्रत्येक रूग्णाची काळजी घेतली जाते. तात्काळ व तत्पर सेवा देऊन त्याच्यावर दर्जेदार उपचार करण्यासाठी विभाग कटिबद्ध असतो. दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन, डॉक्टरांचे सहकार्य आणि टेक्निशियन, परिचारीकांचे परिश्रम यामुळे आम्ही यशस्वी होत आहोत.- स्वाती माळीविभाग प्रमुख, डायलेसिस विभाग, जिल्हा रूग्णालय बीड

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडHealthआरोग्य