शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

डायल केला ११२ क्रमांक, पोलिस आले ८.४० मिनिटांत

By सोमनाथ खताळ | Updated: February 8, 2024 07:29 IST

तत्पर सेवा : मीरा भाईंदरमध्ये सर्वांत जलद, तर धुळे जिल्ह्यात सर्वांत उशिराने मिळाली मदत; साडेअकरा लाख लोकांचे कॉल

सोमनाथ खताळ  बीड : सामान्य नागरिक कोणत्याही अडचणीत असेल तर त्याने डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले होते. २०२३ या वर्षात ११ लाख ४५ हजार लोकांनी यावर संपर्क साधून मदत घेतली. यावर पोलिसही सतर्क असल्याचे दिसले. कॉल आल्यानंतर पोलिसांनी  ८ मिनिटे ४० सेकंदांत संबंधिताला मदत केली आहे. राज्यात ३ मिनिटे २५ सेकंदांत अशी सर्वांत जलद सेवा मीरा भाईंदरमध्ये, तर सर्वांत उशिरा धुळे जिल्ह्यात मिळाली आहे. येथील पोलिसांचा मदतीचा वेळ हा १५ मिनिटे २२ सेकंद एवढा आहे.

महिलांच्या संबंधित जास्त तक्रारीडायल ११२ या क्रमांकावर सर्वांत जास्त तक्रारी या महिलांच्या संबंधित आहेत. त्यातही घरगुती वादाचे प्रकार अधिक आहेत.

प्रत्येक ठाण्यात ‘एमडीटी’ मशिनnराज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात डायल ११२ यासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत, तसेच मुख्यालयाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष आहे.nप्रत्येक पोलिस ठाण्यात २ ते १० एमडीटी (मोबाइल डेटा टर्मिनल) मशीन दिलेल्या आहेत. यावर कॉल येताच संबंधित पोलिस मदतीसाठी रवाना होतात.

दिशाभूल केल्यास गुन्हाnडायल ११२ वर अनेक कॉल हे फेक किंवा पोलिसांशी संबंधित नसतात. हे कॉल निकाली काढले जातात; परंतु अनेकदा पोलिसांची मुद्दामहून दिशाभूल केली जाते.  nकाही दिवसांपूर्वी बीडमध्ये पोलिसांची दिशाभूल करणारा फोन आला होता. असे दिशाभूल करणारे कॉल करू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

‘बायको नांदत नाही’माझी बायकोच नांदत नाही, बस चालकांनी बसच थांबवली नाही, शेजाऱ्यांचे सांडपाणी आमच्या दारासमोर येत आहे, आमच्या नळाला पाणी कधी येणार, आमच्याकडे घंटागाडीच येत नाही, परिसरातील वीज गेली, अशा तक्रारीही ११२ क्रमांकावर येतात.

कोठून किती कॉल अन् मदत कधी?

 

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस