शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत धोंडे- फडणवीस भेट; नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या समीकरणाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 17:43 IST

Dhonde-Fadnavis meet in Mumbai या निवडणुकीत भाजपचे विधान परिषदेचे आ. सुरेश धस आणि माजी आमदार भिमराव धोंडे यांचे दोन पॅनल असतील हे उघड आहे.

- अविनाश कदम 

आष्टी : आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तिन्ही नगर पंचायतीच्या निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. भीमराव धोंडे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी त्यांनी विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे आगामी नगर पंचायत निवडणुकीसाठी नेतृत्वाचे वेगळे समीकरण पाहायला मिळेल असे संकेत मिळत आहेत. 

माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गुरुवारी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना गहिनीनाथ गड येथील पुण्यतिथी सोहळयास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले. यानंतर शुक्रवारी त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दरम्यान, मतदारसंघातील  विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, ही भेट आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर झाल्यामुळे मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीमुळे भारतीय जनता पार्टी आगामी तिन्ही नगर पंचायतीच्या निवडणुका माजी आ. भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली लढविणार असल्याचे सूचित होत आहे.

धस की धोंडे ? कोण करणार नेतृत्व  आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायत वर सध्या प्रशासक आहेत. येथील निवडणूका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत भाजपचे विधान परिषदेचे आ. सुरेश धस आणि माजी आमदार भिमराव धोंडे यांचे दोन पॅनल असतील हे उघड आहे. यामुळे तिन्ही निवडणुकीत भाजप धस की धोंडे या दोघांपैक्की कोणावर विश्वास टाकत त्याच्या गटाला एबी फॉर्म देऊन नेतृत्व करण्याची संधी देणार यावर चर्चा रंगत आहेत. यामुळेच माजी आमदार भिमराव धोंडे भाजपचे विरोधी पक्षनेते फडणवीस आणि प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट लक्षवेधी ठरत आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाBeedबीड