केज : कृषी दिनाचे औचित्य शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर किसान मोर्चाच्या वतीने गुरुवारी केज तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शेतीच्या संरक्षणासाठी सवलतीच्या दरात कुंपण करण्यासाठी नवीन योजना सुरू करावी. वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे एकरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पोखरा योजनेंतर्गत लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान करावी. यासह पीकविमा लागू न झाल्याने, दोषी कृषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. मुख्यालयी न थांबणाऱ्या कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी केज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी होळचे ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते जयराज पाटील, सचिन घुगे, ईश्वर बिक्कड, सोनू सावंत, विक्रम डोईफोडे, पंडित ठोंबरे, अशोक चाटे, अमोल शेप, श्याम सांगळे, शैलेश शिंदे, ओमकेश नेहरकर, मनोज राख, दत्ता घुगे, विठ्ठल सायगुंडे, अशोक इंगळे, अनिल मोरे, मुक्तीराम आंधळे, रामराजे नागरगोजे, वसंत केदार, बालासाहेब नागरगोजे, शरद सावंत, अशोक वायबसे, मेघराज मुंडे, मोहन चाटे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
010721\29542322-img-20210701-wa0027.jpg
कृषी दिनी शेतकऱ्याच्या विविध मागण्या संदर्भात करण्यात आलेले धरणे आंदोलन लेखी आश्वासना नंतर मागे घेण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन देताना ना.तहसीलदार सचिन देशपांडे.