शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘कायाकल्प’मध्ये महाराष्ट्रात धानोरा ग्रामीण रूग्णालय द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 16:12 IST

केज उपजिल्हा रूग्णालयासह नेकनूरचे स्त्री, नांदुरघाट, धारूर, पाटोदा ग्रामीण रूग्णालयालाही बक्षिस

- सोमनाथ खताळ

बीड : महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिले जाणारे कायाकल्पचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयाने महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावला  आहे. तसेच केज उपजिल्हा रूग्णालयासह नेकनूरचे स्त्री, नांदुरघाट, धारूर, पाटोदा ग्रामीण रूग्णालयालाही प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. या पुरस्कारांमुळे आरोग्य विभागाची मान उंचावली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कायाकल्प अंतर्गत आरोग्य संस्थांना स्वच्छतेच्या मुख्य निकषासह इतर निकषावर आधारीत राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. यावर्षी बीड जिल्ह्यातील सात संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये राज्यातील दुसरा दहा लक्ष रूपयांचा पुरस्कार धानोरा ग्रामीण रूग्णालयाला मिळाला आहे. तसेच धारूर, पाटोदा, नांदुरघाट या ग्रामीण रुग्णालयांसह केजचे उपजिल्हा आणि नेकनूरच्या स्त्री रूग्णालयास प्रोत्साहन एक लाख रूपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्वांचा उत्तेजनार्थमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी केजच्या उपजिल्हा रूग्णालयाने सहभाग नोंदवून यश संपादन केले होते. गतवर्षीही केजसह परळीच्या उपजिल्हा रूग्णालयांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये केजला दहा लाख रूपयांचा राज्यातील दुसरा तर परळीला उत्तेजनार्थ म्हणून एक लाख रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरीदास, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.संजीवणी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व संस्था यशस्वीपणे काम करीत आहेत.

या टिमने घेतले परिश्रमआरोग्य सेवा उत्कृष्ट देऊन कारभार सुधारण्यात धानोऱ्याचे डॉ.रंजीत जाधव, धारूरचे डॉ.बालासाहेब सोळंके, डॉ.चेतन अदमाने, केजचे डॉ. दिपक लांडे, पाटोद्याचे डॉ. महादेव चिंचोले, नेकनूरचे डॉ.सुधीर राऊत, नांदुरघाटच्या डॉ. महानंदा मुंडे या वैद्यकीय अधीक्षकांनी यासाठी परिश्रम घेतले. या पुरस्कारात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

राजकीय आरोपांना प्रत्युत्तरलोकसभा निवडणूकीदरम्यान, आरोग्य विभाग काम करीत नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यावर राजकीय आरोप झाले. मात्र, आपण आरोग्य सेवेत राजकारण आणत नाही. तात्काळ व तत्परे सेवा देण्याबरोबरच प्रशासन सुधारून राज्यात अव्वल ठरू शकतोत, हे या पुरस्कारांच्या माध्यमातून समोर आले आहे. आपल्या कामाच्या माध्यमातनू डॉ.थोरात यांनी आरोप करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आरोग्य विभागात आहे.

महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. यापुढेही कामाची लय कायम ठेवली जाईल. आम्हाला यामुळे नक्कीच प्रोत्साहन मिळेल. हे सर्व यश माझ्या टिमचे आहे.- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारhospitalहॉस्पिटल