शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Dhananjay Munde: ऊसाचे राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 19:49 IST

वागबेट येथील सव्वा कोटी रुपयांच्या पेयजल योजनेसह विविध विकास कामांचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

परळी :बीड जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र यावर्षी अतिरिक्त असून संपूर्ण ऊस गाळप होण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी सर्व ऊस गाळप केला जाईल यासाठी प्रयत्न करावेत. जाणीव पूर्वक राजकारण साधण्यासाठी ऊसाची अडवाअडवी कोणी करत असेल तर असे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, त्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

वागबेट गावची मागणी असलेल्या नागापूर धारणातून वागबेट येथे पाणी आणण्याच्या एक कोटी 26 लाख रुपयांच्या पेयजल योजनेसह गावातील हनुमान मंदिरासमोरील सभागृह (25 लाख) या कामांचे भूमिपूजन तसेच स्मशान भूमी, बैठक व्यवस्था, सिमेंट रस्ते आदी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले

गावाजवळील पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावचे सरपंच व सदस्यांनी नागापूरच्या धरणातून पाणी आणावे अशी मागणी होती, त्यानुसार या कामास मंजुरी देण्यात आली आहे. वागबेट गावसह तालुक्यात शेकडो सिंचन विहिरांना पंचायत समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, तसेच याही वर्षी 5000 विहिरींना मंजुरी देण्यात येणार असल्याचेही  धनंजय मुंडे म्हणाले. 

लोकसंख्येच्या प्रमाणाचा प्रश्न असताना देखील धनंजय मुंडे यांनी विशेष प्रयत्न करून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला असून, हे गाव कायमस्वरूपी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास गावकऱ्यांच्या वतीने सरपंच अमरनाथ गित्ते यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक कराड, सरपंच अमरनाथ गित्ते, पंचायत समिती सदस्य माऊली मुंडे, श्रीकांत  फड, हरीश नागरगोजे, बापू नागरगोजे, प्रल्हाद नागरगोजे, युनूस भाई, गोविंद कराड यांसह आदी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे