शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

हे एक राजकीय षडयंत्र, इनामी जमिनी माझ्या किंवा कुटुंबियांच्या नावे नाहीत: सुरेश धस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 11:55 IST

आष्टी येथील आठ देवस्थान इनाम जमीन घोटाळ्याचे प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे.

- नितीन कांबळेकडा ( बीड) - तालुक्यातील देवस्थान इनामी जमीन प्रकरणी नुकताच आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी व भावावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी आता आ. धस यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. देवस्थान इनामी जमीन माझा किंवा माझ्या कुटुंबाच्या नावावर नाहीत. हे एक राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप यावेळी आ. धस यांनी केला. 

आष्टी येथील आठ देवस्थान इनाम जमीन घोटाळ्याचे प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे. याप्रकरणी बुधवारी आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी व भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत विविध राजकीय चर्चा सुरु असताना आज सकाळी आ. धस यांनी आष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. 

ते म्हणाले की, देवस्थानच्या इनामी जमिनी माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या नावावर नाहीत. सर्व आरोप निराधार आहेत. मी ज्या ट्रस्टवर आहे त्याबाबतच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मी जुन्या पक्षात काम करत होतो, त्यातील राज्य व जिल्हास्तरावरील लोकांचे हे राजकीय षडयंत्र आहे. पोलिसांच्या चौकशीला मी तयार असून संपूर्ण सहकार्य करणार आहे. लवकरच 'दुध का दुध और पाणी का पाणी' होईल. लोकसेवका विरोधात तक्रार आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते.  याप्रकरणात तशी परवानगी अद्याप घेतली गेली नाही. जर असेच घडत राहिले तर कोणत्याही लोकसेवकाविरोधात याचा अस्त्र म्हणून वापर होईल असेही आ. धस यावेळी म्हणाले. 

टॅग्स :BeedबीडSuresh Dhasसुरेश धसBJPभाजपा