शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

७ अंडरवेअर घालून लपविले डिव्हाइस; हायटेक कॉपीच्या माध्यमाने पास करणारे रॅकेट, मास्टर माइंड कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 08:35 IST

सरकारी परीक्षांमध्ये हायटेक पद्धतीने कॉपी करून पास करण्याचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांना आहे.  

बीड : परीक्षा केंद्रात प्रवेश करताना मेटल डिटेक्टरद्वारे परीक्षार्थींची तपासणी केली जाते. मात्र, मेटल डिटेक्टर यंत्राला मायक्रो डिव्हाइस कनेक्टर व इतर साहित्य शोधता येऊ नये म्हणून आरोपी परीक्षार्थीने चक्क एकावर एक अशा सात अंडरवेअर परिधान करून डिव्हाइस लपविल्याची धक्कादायक बाब चौकशीतून समोर आली आहे. सरकारी परीक्षांमध्ये हायटेक पद्धतीने कॉपी करून पास करण्याचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांना आहे.     शहरातील स्वामी विवेकानंद कॉम्प्युटर सेंटर येथे पुरवठा निरीक्षक या पदासाठी २८ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन परीक्षा घेतली गेली. त्यावेळी परीक्षार्थी लहू मच्छिंद्र काळे (रा. बकरवाडी, ता. बीड) हा बाथरूममध्ये बराच वेळ थांबल्याने त्याच्यावर केंद्रावरील कर्मचाऱ्यांना संशय आला. तो परतल्यानंतर त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे मायक्रो डिव्हाइस व इतर साहित्य आढळून आले. परीक्षार्थींची केंद्रात सोडताना मेटल डिटेक्टर मशीनद्वारे तपासणी केली जाते. इलेक्ट्रॉनिक साहित्य जसे की मोबाइल व इतर वस्तू शर्टच्या आतमध्ये लपविल्या असतील तर मशीनची बीप वाजते. ही बाब आरोपी लहू काळे यास माहिती असल्याने परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी त्याने एकावर एक अशा सात अंडरवेअर परिधान करून त्याच्या आतमध्ये मायक्रो डिव्हाइस कनेक्टर व इतर साहित्य लपविले होते.

मास्टर माइंड कोण? एक ते दोन वर्षांपूर्वी आरोग्य विभाग घोटाळ्याचे कनेक्शन बीड तालुक्यातील बकरवाडीसोबत जोडले गेले होते.आता ब्लुटूथ मायक्रो डिव्हाइसद्वारे कॉपी करताना पकडलेला लहू काळेसुद्धा बकरवाडीचाच आहे.हा योगायोग आहे की, अन्य दुसरा प्लॅन हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.यामागचा मास्टर माइंड कोण आहे? या टोळीत कितीजण सक्रिय आहेत? यापूर्वी अशा किती परीक्षा काळे याने दिल्या आहेत?या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे.

टॅग्स :examपरीक्षाGovernmentसरकार