शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मी गहिनिनाथ गडाचा सेवेकरी; यापुढे निमंत्रणाची वाट न पाहता येत राहणार: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 14:29 IST

वारकरी संप्रदायाचा मंत्र जपुया सर्व एकत्र राहुयात

- नितीन कांबळेकडा- गडाचा सेवेकरी म्हणून सेवा करत असताना भक्ताची गैरसोय होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर निधी दिला जाईल. मागील वर्षाचा दिलेला शब्द या वर्षी २५ कोटी रूपये देऊन पूर्ण केला आहे. यापुढे देखील विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच मी गहिनिनाथ गडाचा सेवेकरी आहे, यापुढे निमंत्रणाची वाट न पाहता देखील गडावर येत राहणार, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथील श्री.संत वामनभाऊ महाराज याच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज दुपारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर, खासदार डाॅ. प्रितम मुंडे, बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. मोनिका राजळे, आ. लक्ष्मण पवार, माजी मंत्री प्रा. राम शिंदे,माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, हभप उत्तम स्वामीजी ओमप्रकाश शेटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराजांनी सेवेकरी म्हणून मला गडावर मान दिला आहे. पुष्षवृष्टीसाठी उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर सेवेकरी म्हणून आलोय. मागच्या पुण्यतिथीला विकास कामाचा दिलेला शब्द यावर्षी पूर्ण केला.भविष्यात येणाऱ्या  निधीतून मोठा निधी दिला जाईल.अठरा पगड जाती धर्मातील सर्व नागरिक येतात. आल्यावर येथे गैरसोय होऊ नये  म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. वारकरी संप्रदायाचा मंत्र जपुया सर्व एकत्र राहुयात. महाराज तुम्ही दरवर्षी मला गडावर  बोलवता पण आता निमंत्रणाची वाट न पाहता देखील मी येणार असल्याच्या भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश, पालकमंत्री धनजंय मुंडे,खासदार डाॅ.प्रितम मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भाषणे झाली. कार्यक्रमास जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्तॅ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडBJPभाजपा