शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निराधार झालेल्या आईला मिळाला मुलांचा आधार; माफी मागत नेले स्वत:च्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:48 IST

लोकमतच्या पाठपुराव्यास यश; रुग्णालयाच्या खाटावरून ८० वर्षीय आई घरातील गादीवर

ठळक मुद्देसांभाळ होत नसल्याने तीन मुलांनी ८० वर्षीय आईला निराधार बनविले होते. निराधार आईला दुर केलेल्या मुलांनीच आधार दिल्याने समाधान

- सोमनाथ खताळ 

बीड : सांभाळ होत नसल्याने तीन मुलांनी ८० वर्षीय आईला निराधार बनविले होते. यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलांचा शोध घेतला. त्यांचे समुपदेशन करून कायद्याची भिती दाखविली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा दोन मुलांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत माफी मागत आईला स्वत:च्या घरी घेऊन गेले. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे जीवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या निराधार आईला दुर केलेल्या मुलांनीच आधार दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एका गावातील सोनाबाई (नाव बदलले) यांना शिक्षक, सुरक्षा रक्षक व टेलरिंंगचे काम करणारी तीन मुले आहेत. मात्र, तिघांच्या वादात त्यांना कोणीच सांभाळत नव्हते. तिघांनीही आईला सांभाळण्यास असमर्थता दर्शवित आजारी असल्याचे सांगत जिल्हा रूग्णालयात दाखल केले. हाच प्रकार ‘लोकमत’ने २८ व २९ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे, अशोक तांगडे यांनी सोनाबाईची भेट घेतली. त्यांच्या मुलांशी संपर्क केला. त्यांना बोलावून घेत समुपदेशन केले. दोन मुलांनी आईची माफी मागितली. तसेच आपण घरी घेऊन जात असल्याचे लेखी लिहून देत सोनाबाईला घरी घेऊन गेले. जिल्हा रूग्णालयात खाटावर असलेल्या सोनाबाईला नंतर गादी घेतली. स्वतंत्र रूममध्ये ठेवून पंखा व इतर सुविधांची सोय केली. हे सर्व झाल्यानंतर आणि मुलांना चुक समजल्यावरच सामाजिक कार्यकर्त्यांनी घरातून काढता पाय घेतला. या सर्व प्रकारामुळे समाधान व्यक्त होत आहे.

मुलांनी टाकून दिलेल्या वृद्ध आईला हवाय आधार! )

‘लोकमत’च्या वृत्तानंतर मदतीसाठी सरसावले हात‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी मदतीची तयारी दर्शविली. औरंगाबादचे अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनीही संपर्क करून सांभाळण्याची इच्छा दर्शविली. तसेच बीडमधील जिव्हाळा सामाजिक संस्था, मुंबई, पुणे, अहदनगर आदी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी संपर्क करून मदतीची इच्छा व्यक्त केली होती.

डॉक्टर, परिचारीकांच्या चेहऱ्यावरही हास्यवारंवार रूग्णालयात अ‍ॅडमिट होत असलेल्या सोनाबाईची परिस्थिती आणि हाल पाहून डॉक्टर, परिचारीकाही भाविक झाल्या होत्या. मागील काही दिवसांपासून तेच सोनाबाईचे नातेवाईक झाले होते. आता त्यांच्या दोन्ही पोटच्या मुलांनीच रूग्णालयात येऊन लेखी देत घरी घेऊन गेल्याने डॉक्टर, परिचारीकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. होणाऱ्या हालातून मुक्त झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडFamilyपरिवारdoctorडॉक्टरBeedबीड