लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जसे मातेच्या स्वास्थ्यावरून बाळाचे स्वास्थ्य अवलंबून असते, तसे संस्था मजबूत व गुणवत्ताधारक असेल तर विद्यार्थी देखील गुणवंत होतात. खाजगी तत्वावर चालणाऱ्या अनेक संस्था बंद पडत आहेत; मात्र आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक कॉलेजची वाटचाल यशस्वी चालू आहे. त्यामुळे हे महाविद्यालय संपूर्ण देशात गुणवत्तेत प्रथम क्र मांकावर असल्याचे प्रतिपादन डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.मंगळवारी सोनाजीराव क्षीरसागर वैद्यकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांचा वाढदिवस व ई-लर्निंगनिमित्त यशवंतराव नाट्यगृहात राज्य स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा मेडिकल सायन्सचे चेअरमन डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ.बजरंग भोसले, डॉ.एम.एन. राव, संस्थेचे प्रशासक प्रा.किशोर मचाले, डॉ.भालचंद्र ठाकरे, डॉ. व्ही.आर.कविश्वर, डॉ.एस.एम.देसर्डा, डॉ.पी.वाय. कुलकर्णी, डॉ.जे.डी. पाटील, डॉ.एस.एस.नरवडकर, डॉ.देवेंद्र पाटील, डॉ.श्रीकांत कुलकर्णी, डॉ.राजकुमार पाटील, डॉ. डी.बी. पाटील, डॉ. सुनील पवार, डॉ.विवेक रेगे, डॉ.डी.जी. बागल, डॉ. प्रताप भोसले, डॉ.अमित भस्मे, डॉ. खामीटकर, डॉ.अरूण जाधव, डॉ.ए. डी. दहाड, डॉ.धाकुलकर, डॉ.वानखेडे आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी स्व.काकू-नाना व डॉ.सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन केले.वैद्यकीय क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. शिक्षण केवळ पुस्तकी न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून देणे आवश्यक झाले आहे. भविष्याचा वेध घेऊन शिक्षणाची गरज ओळखणे महत्वाचे आहे. शिक्षा, शिक्षण आणि शिक्षक या त्रिसूत्रीवर विद्यार्थ्यांचे यश अवलंबून आहे, असे प्रतिपादन डॉ. मिश्रा यांनी केले.अध्यक्षीय समारोप करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी शासकीय उपचार पध्दतीमध्ये आता होमिओपॅथीचे उपचार ही शासकीय स्तरावर देत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा.अरुण भस्मे यांनी केले. डॉ.बजरंग भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीणकुमार यांनी केले, तर आभार डॉ.महेंद्र घोशाळ यांनी मानले. कार्यशाळेस राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांसह विद्यार्थी, पालक, कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या गुणवत्तेवरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:09 IST
जसे मातेच्या स्वास्थ्यावरून बाळाचे स्वास्थ्य अवलंबून असते, तसे संस्था मजबूत व गुणवत्ताधारक असेल तर विद्यार्थी देखील गुणवंत होतात. खाजगी तत्वावर चालणाऱ्या अनेक संस्था बंद पडत आहेत; मात्र आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक कॉलेजची वाटचाल यशस्वी चालू आहे. त्यामुळे हे महाविद्यालय संपूर्ण देशात गुणवत्तेत प्रथम क्र मांकावर असल्याचे प्रतिपादन डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
संस्थेच्या गुणवत्तेवरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता अवलंबून
ठळक मुद्देवेदप्रकाश मिश्रा : राज्यस्तरीय कार्यशाळा