शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बीडहून 'आदिशक्तींचे पंढरपूरकडे' प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 19:03 IST

दोन दिवसांच्या संत सहवासाने बीड शहर झाले 'शक्तिमय'

- समर्थ भांड

बीड : खान्देशातून मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेने निघालेला आदिशक्ती मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा बीड शहरात दोन दिवस मुक्कामी थांबल्यानंतर शुक्रवारी पंढपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. शुक्रवारी सकाळी जैन भवन येथे हरिनामाच्या गजरात आजोबा गोविंदपंत व मुक्ताबाईंच्या पादुकांची भेट व महाआरती झाली. मागील वर्षीपासून नवगण राजुरी येथील शंकरानंद तीर्थ यांची दिंडीदेखील पालखी सोहळ्यात सामील होत आहे. आदिशक्ती मुक्ताबाई यांची पालखी दोन दिवस बीड शहरात मुक्कामी होती. पहिल्या दिवशी माळीवेस येथील हनुमान मंदिरासमोर जिल्ह्यातील दुसरा रिंगण सोहळा पार पाडत भाविकांनी विश्राम घेतला, तर दुसऱ्या दिवशी माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, जुना बाजारमार्गे भाविकांना दर्शन देत बालाजी मंदिरात मुक्काम केला. दोन दिवस भाविकांच्या सहवासाने बीड शहर 'शक्तिमय' झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरातील भाविकांचा उत्साह दिसून आला. दरम्यान, बालाजी मंदिरातून पालखीने प्रस्थान केल्यानंतर बार्शी नाका येथे पहिला विश्राम घेतला. यावेळी भाविकांनी फळांसह विविध खाद्यपदार्थांचे वाटप केले. पाली येथे पालखीचा मुक्काम होता.

नात आजोबांची भेट काळजाला पीळ पाडणारीआजोबा गोविंदपंत व आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पादुकांची स्पर्श भेट काळजाला पीळ पाडणारी होती. गोविंदपंत यांच्या पादुका आदिशक्तींना पंढरीकडे मार्गस्थ करण्यासाठी नगराबाहेर आणल्या गेल्या होत्या. वर्षभरानंतर आपल्या वृद्ध आजोबाला नात भेटायला येते हा क्षण आमच्यासाठी खूप भावनात्मक असल्याचे पालखी कार्यवाह राजेंद्र संबारे यांनी सांगितले.

१२० वी दिंडी शंकरानंद तीर्थांचीआदिशक्ती मुक्ताबाई यांची पालखी ११९ दिंड्यांना घेऊन बीडमध्ये आली होती. आता यापुढे दिंड्यांची संख्या वाढत चालली आहे. नवगण राजुरी येथील शंकरानंद तीर्थ यांची दिंडीदेखील या पालखी सोहळ्यात सामील झाली. आता १२०वी (दिंडी क्रमांक) दिंडी शंकरानंद तीर्थ यांची आहे. मागील वर्षापासून ही दिंडी पालखीत सामील होत आहे.

टॅग्स :BeedबीडAshadhi Ekadashiआषाढी एकादशी