शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:12 IST

मागील दोन पिढयांपासून प्रलंबित असलेल्या अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्राधान्याने लक्ष देऊन लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी करत अ‍ॅड. संतोष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : मागील दोन पिढयांपासून प्रलंबित असलेल्या अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्राधान्याने लक्ष देऊन लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी करत अ‍ॅड. संतोष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा निर्मितीच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना देण्यात आले.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी १९६२ पासून सातत्याने होत आहे. भौगोलिकदृष्ट्या अंबाजोगाई हेच ठिकाण जिल्ह्यासाठी अत्यंत योग्य असल्याचेही विविध सर्वेक्षणात आढळून आले आहे. तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक जवळपास सर्व कार्यालये अंबाजोगाईमध्ये आहेत. जिल्हा निर्मिती संदर्भात प्रशासकीय पातळीवरून चाचपणी होऊन जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाई पात्र असल्याचा अहवाल मुख्य सचिवांना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शासनाने यांनी अंबाजोगाईकरांच्या भावनांचा आदर करून जिल्हा घोषित करावा अशी मागणी अ‍ॅड. लोमटे यांनी केली आहे.निवेदनावर अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. माधव जाधव, भैरवनाथ देशमुख, वैजनाथ देशमुख, निशिकांत पाचेगावकर, अभिजीत जोंधळे, नामदेव गुंडाळे, अमृत महाजन, प्रा. शैलेश जाधव, अ‍ॅड. प्रशांत शिंदे, प्रशांत आदनाक, प्रवीण जायभाये, मनोज लोढा, ललित झिरमिरे, अनिकेत देशपांडे, महेश आंबाड, अमोल विडेकर, रणजित मोरे, गोविंद टेकाळे, अंकुर मोरे, अमोल गोस्वामी, अकबर जहागीरदार, परमेश्वर सोनवणे, लक्ष्मीकांत ठोके, विजयकुमार बामणे, मनेश गोरे, अविनाश मेहता, परशुराम मेहता, आर.ए. सय्यद यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईagitationआंदोलन