शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकात बोलवा, शिक्षा द्या; राज ठाकरेंचा पुन्हा निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:47 IST

देशातील प्रत्येकाने मोदींना आमच्या चौकात कधी येता याची विचारणा करणारे पत्र लिहिली पाहिजे. असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

बीड : नरेंद्र मोदींचानोटबंदीचा निर्णय फसला आहे. नोटबंदीचा निर्णय जर चुकला तर मला चौकात उभे करून हवी ती शिक्षा द्या असे सांगितले होते, आता देशातील प्रत्येकाने मोदींना आमच्या चौकात कधी येता याची विचारणा करणारे पत्र लिहिली पाहिजे. असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

माझे ठोकताळे खरे ठरतात त्यानुसार नरेंद्र मोदी आता पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असेही राज ठाकरे म्हणाले. पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी बीड येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 

नोटबंदीला पहिला विरोध मी केला मी अनेक दिवसांपासून नोटबंदी विरोधात बोलत आहे. नोटबंदी झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा विरोध करणारा मी एकमेव नेता होतो. आणि आरबीआय मधील नोटा जमा झाल्यानंतर, नोटबंधीचा निर्णय फसली हे स्पष्ट आहे, आता मोदी कोणत्या चौकात येणार आहेत, तुम्ही आमच्या चौकत येता की बाजूच्या हे देशाने मोदींना विचारले पाहिजे. 

एकत्र निवडणुका कशासाठी एव्हीएमच्या तसेच एकत्र निवडणुकांच्या विषयावर देखील राज ठाकरेंनी टीका केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ' एकत्र कशासाठी, तुमचे होऊ घातलेले पराभव झाकण्यासाठीच का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला, उद्या पुन्हा कोठे त्रिशंकू परिस्थिती उद्भवली तर काय करणार, पुन्हा निवडणूक घेत राहणार का ? तुमचे पराभव झाकण्यासाठी देश निवडणुकीच्या रांगेत उभा करणार का ? असे ही ते यावेळी म्हणाले. 

मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात इव्हीएमद्वारे निवडणूक पद्धत साऱ्या जगाने रद्द केली त्याचा हट्ट कशासाठी ? तुम्ही काय साधणार आहात ?  असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. इव्हीएमचे प्रताप साऱ्या देशाने पाहिले असून आता जुन्या पद्धतीने मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची त्यांनी मागणी केली. 

इव्हीएममुळे भाजप विजयी मतदान यंत्रे सत्ताधाऱ्यांच्या हाती असतील तर निवडणूक लढवायच्या कशासाठी असेही ठाकरे म्हणाले. ईव्हीएम सत्ताधाऱ्यांच्या हातात पुढील निवडणुका पटपत्रिकेवर घेण्यात याव्यात यासाठी सर्व पक्षाने एकत्र आले पाहिजे, यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे, ईव्हीएम मुळेच भाजपचे उमेदवार निवडून येतात अशी टीका ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीDemonetisationनिश्चलनीकरणNote Banनोटाबंदी