शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मताधिकार वापरला तरच लोकशाही भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:18 IST

नागरिकांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने वापरला पाहिजे व आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी तसेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नागरिकांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने वापरला पाहिजे व आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी तसेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. ते राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमास जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, प्राचार्य भालचंद्र कराड, आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले, लोकशाहीच्या मजबुती करणासाठी मतदाराची भूमिका बजावतांना प्रत्येक मतदाराने आपली जबाबदारी ओळखावी असे सांगून मतदानाचे महत्व स्पष्ट केले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे, आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच निवडणूक आयोगाने सोशल मिडियाचा मोठया प्रमाणात वापर करुन विविध माध्यमातून माहिती उपलब्ध करुन दिली आहे त्याचा उपयोग नागरिकांनी व मतदारांनी करावा. येणाऱ्या निवडणुकीत मतदानामध्ये पारदर्शकता यावी यासाठी व्हीव्हीपॅट मशिनचा वापर होणार आहे याची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. १८ वर्ष पुर्ण झालेल्या प्रत्येक युवक, युवतीने मतदार यादीत नाव नोंदणी करावी व मतदानाचा हक्क बजवावा, असेही ते यावेळी म्हणाले.मतदार जागृतीसाठी काढली रॅलीजिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ केली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण धरमकर,तहसिलदार अविनाश शिंगटे, शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, शिक्षणाधिकारी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीमध्ये बीड येथील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, अधिका-यांचा सहभाग नोंदविला.

टॅग्स :Electionनिवडणूकgovernment schemeसरकारी योजनाSocialसामाजिक