शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील पपईला दिल्लीत मागणी; चार एकरांतील पपईतून १३ लाखांची बक्कळ कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 13:55 IST

ताईवान ७८६ या जातीची पपई अत्यंत गोड असून खायला पण दर्जेदार लागत असल्याने या पपईला दिल्ली , मुंबई ,हरियाणा या भागातून चांगली मागणी असते.

ठळक मुद्देदहा महिन्यात या फळबागेवर २ लाख ५०  हजार रुपये खर्च केला.सर्व खर्च जाऊन १० लाख रूपये निव्वळ नफा

माजलगाव : तालुक्यातील लवुळ येथील शेतकरी हनुमान शिंदे यांच्या शेतातील पपईला दिल्ली येथून मागणी आल्यामुळे या पपईला चांगला भाव मिळाला. त्यामुळे चार एकरात या शेतकऱ्याला १३  लाखांचे उत्पन्न मिळाले.

माजलगाव तालुक्यातील लवुळ येथील शेतकरी हनुमान उर्फ बाळासाहेब राधाकिशन शिंदे यांची शेती लवुळ - परडी माटेगाव या रस्त्यावर असून तेथे त्यांनी जानेवारीमध्ये  चार एकरात ४ हजार झाडांची पपईची फळबाग केली. दहा महिन्यात या फळबागेवर त्यांनी २ लाख ५०  हजार रुपये खर्च केला. या दरम्यान चांगला पाऊस झाल्याने या झाडांना फळे जास्त प्रमाणात लागली. या एका फळाचे वजन हे चार किलोपर्यंत भरले. 

ताईवान ७८६ या जातीची पपई अत्यंत गोड असून खायला पण दर्जेदार लागत असल्याने या पपईला दिल्ली , मुंबई ,हरियाणा या भागातून चांगली मागणी असते. हनुमान शिंदे यांच्या पपईला दिल्लीतून  मागणी आली. या पपईला जागेवर १२-१३ रूपये भाव मिळाल्याने त्यांना चार एकर शेतात जवळपास १३  लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. सर्व खर्च जाऊन १० लाख रूपये निव्वळ नफा मिळाल्याने या शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले.यापूर्वी या शेतकऱ्याने सीताफळ, मोसंबी ,टरबूज आदी फळबागा केल्या मात्र  कमी खर्चात जास्त उत्पन्न पपई या फळबागेत मिळाल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. या पपईच्या बागेतून आणखी उत्पन्न मिळविणार असल्याचे हनुमान शिंदे यांनी सांगितले.

आमच्या पपईला १५-१६ रूपयांपर्यत भाव अपेक्षित होता परंतु सर्वच ठिकाणी पपईचे उत्पादन चांगले असल्याने आम्हाला भाव कमी मिळाला. असे असले तरी आम्हाला मिळालेल्या भावात  समाधान मिळाले. या भागातील शेतकऱ्यांनी कापूस ,ऊस या पिकांच्या पाठीमागे न लागला कोणतीही फळबाग लागवड करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.     - हनुमान शिंदे, पपई उत्पादक शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजार