बागेतील फळे नासण्याची भीती
प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही फळविक्री करत आहोत, माझी चिकु या फळाची बाग आहे. १० दिवस टाळेबंदी मुळे शेतातील तयार माल नासण्याची भीती आहे. त्यामुळे माझे मोठे नुकसान होणार आहे. प्रशासनाने टाळेबंदीचा कठोर निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहे.
-बाजीराव काशिद, फळविक्रेता.
निर्बंध लादा, व्यवसाय चालू ठेवा
प्रशासन सामान्य व्यक्तीचा सुरक्षेसाठीच टाळेबंदीचा निर्णय घेत आहे.परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लादून व्यवसाय कसे चालू ठेवता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण व्यवसाय,उद्योग अडचणीत आला तर परत अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. त्यामुळे कडक निर्बंध लादून सर्वच व्यवस्था चालू ठेवावी आणि नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे- माधव निर्मळ, ज्येष्ठ उद्योजक, धारुर
===Photopath===
260321\_dsc9716_14.jpg