शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सर्च वॉरंट नसताना दिल्ली पोलिसांनी घरातून हार्डडिस्क नेली; शंतनूच्या वडिलांची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 13:12 IST

Greta Thunberg Toolkit Controversy : Police rais at Shantanu Muluk's Beed Home घराची झडती घेत शंतनूच्या रूममधून एका संगणकाची हार्डडिस्क, एक पुस्तक, मोबाईल कव्हर व पर्यावरण पोस्टरदेखील जप्त केले.

ठळक मुद्देदिल्ली येथे गेल्यानंतर हे साहित्य परत दिले जाईल, असे तोंडी आश्वासन त्यांनी दिलेपोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सर्च वॉरंट दाखवला नाही किंवा साहित्य जप्तीसंदर्भातदेखील लेखी काही दिले नाही

बीड : घराचे सर्च वॉरंट नसताना १२ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली पोलिसांनी घराची झडती घेत घरातील कॉम्प्युटरची हार्डडिस्क, एक पुस्तक व इतर साहित्य नेल्याप्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनूचे वडील तथा येथील माजी नगराध्यक्ष शिवलाल मुळूक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

शिवलाल मुळूक यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, १२ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान त्यांच्या चाणक्यपुरी (बीड) येथील घरी दोन व्यक्ती आल्या. त्यांनी दिल्ली पोलीस असल्याचे सांगून, ओळखपत्र दाखवत आम्हाला शंतनूविषयी चौकशी करावयाची असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी माझ्या घराची झडती घेत शंतनूच्या रूममधून एका संगणकाची हार्डडिस्क, एक पुस्तक, मोबाईल कव्हर व पर्यावरण पोस्टरदेखील जप्त केले. तसेच दिल्ली येथे गेल्यानंतर हे साहित्य परत दिले जाईल, असे तोंडी आश्वासन त्यांनी दिले; परंतु हे सर्व करताना त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सर्च वॉरंट दाखवला नाही किंवा साहित्य जप्तीसंदर्भातदेखील लेखी काही दिले नाही. तसेच जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामादेखील केला नाही. ही कारवाई करताना स्थानिक प्रशासनातील अधिकारी त्यांच्यासोबत नव्हते. १२ फेब्रुवारीपासून ते लोक बीडमध्येच थांबलेले आहेत. त्यांनी दोन ते तीन वेळा कॉल करून शासकीय विश्रामगृहावर बोलावून घेत शंतनूबाबत माझ्याकडे चौकशी केल्याचे मुळूक यांनी निवेदनात नमूद केले आहे. दिल्ली पोलिसांनी घराच्या झडतीचे पत्र किंवा साहित्य जप्तीचे पत्र न दाखवता त्यांनी कारवाई केली. या प्रकाराची नोंद घेऊन बीड पोलीस अधीक्षकांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मुळूक यांनी निवेदनाद्वारे अधीक्षकांकडे केली आहे.

दिल्ली पोलिसांनी सर्च वॉरंट नसताना साहित्य जप्त केल्याची शंतनू मुळूक यांच्या वडिलांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल.- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :Greta Thunbergग्रेटा थनबर्गToolkit Controversyटूलकिट वादBeedबीड