शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

परंपरेला झुगारून महिलांनी केला मारुती मंदिरात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 06:24 IST

परिवर्तनाचा लढा; धानोरा येथील महिलांच्या निर्णयाचे स्वागत

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई (जि. बीड) :  तालुक्यातील  धानोरा (बुद्रुक) येथील  महिलांनी रविवारी सकाळी एकत्रित येऊन मारुतीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. वर्षानुवर्षे प्रवेशासाठी मज्जाव असणारी ही रूढी-परंपरा महिलांनी संघटित होऊन मोडीत काढली. ग्रामीण भागातील महिलांनी संघटित होऊन पुकारलेल्या या  परिवर्तनाच्या  लढ्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नसणे आणि पुरुषांना प्रवेश असणे म्हणजे लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव आहे. महिलांना केवळ मासिक पाळी येते आणि त्या काळात तिला विटाळ म्हणून लांब ठेवणे योग्य नाही. तर महिलेच्या मासिक पाळीमुळे सर्वांच्या जन्माची वेळ येते. त्यामुळे मासिक पाळीला आनंदाने समाजाने स्वीकारले पाहिजे, असे मत गावातील सामाजिक कार्यकर्त्या  आशालता आबासाहेब पांडे यांनी धानोरा गावातील महिला मंडळाच्या बैठकीत व्यक्त केले. पांडे यांनी गावातील सर्व महिलांना संघटित करून हा लढा उभारला. मारुती मंदिरात महिलांना प्रवेश नाही, ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. 

रविवारी सकाळी  आशालता आबासाहेब पांडे, चित्रा बाळासाहेब पाटील यांनी निश्चय व्यक्त करून महिलांना सोबत घेत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला व नारळ फोडले. महिलांना मज्जाव असतो. ही पिढ्यान् पिढ्यापासून  चालत आलेली प्रथा परंपरा महिलांनी मोडीत काढली. 

nमारुती हा ब्रह्मचारी आहे. नारळ हे फक्त पुरुषांनीच फोडायचे; पण या सामाजिक व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न धानोरा  बुद्रुक येथील एकल महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आशालता पांडे, चित्रा पाटील व मंडळातील सर्व महिलांनी केला आहे.   

आम्हाला पण भारतीय संविधानाने अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा वापर करून आगामी काळात ही महिलांचे मजबूत संघटन करून जुन्या प्रथा, अंधश्रद्धा मोडीत काढू.-आशालता पांडे, सामाजिक कार्यकर्त्या, अंबाजोगाई. 

टॅग्स :BeedबीडWomenमहिला