शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

मृत्यू जवळून पाहिला; वळणावर चालकाचा ताबा सुटला, लोखंडी रेलिंग कारच्या आरपार गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 20:07 IST

कानिफनाथ डोंगराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

- नितीन कांबळे कडा (बीड): पुण्याहून कुटुंबासह नांदेडकडे नातेवाईकांच्या भेटीसाठी जात असताना चालकाचा वळणावर अचानक ताबा सुटल्याने सुरक्षेसाठी लावलेली लोखंडी रेलिंग थेट कारमध्ये घुसली. यात एकाच कुटुंबातील चारजण प्रवास करत होते. यातील एकाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सुर्यकांत आरडे ( ७० ) असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपरीघाट परिसरात झाला.

नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने पुण्याहून आरडे कुटुंब नांदेडकडे कारमधून ( एम.एच २९,ए.आर. २५९६ ) निघाले होते. बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावरून ते दुपारी प्रवास करत होते. दरम्यान, आष्टी तालुक्यातील पिंपरीघाट येथील कानिफनाथ डोंगराच्या वळणावर चालक रोहन आरडेचा स्टेरिंगवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूच्या सुरक्षा कठड्यावर आदळली. जोरदार धडकेने लोखंडी रेलिंग थेट कारमध्ये घुसली. यात सुर्यकांत आरडे यांचा मृत्यू झाला. तर पत्नी अनिता आरडे, मुलगा रोहन सुर्यकांत आरडे, कोमल रोहन आरडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड