जिल्ह्यात मंगळवारी ४,१८३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात १४८ पॉझिटिव्ह तर ४,०३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १३, आष्टी २२, बीड २२, धारुर ४, गेवराई २८, केज १४, माजलगाव ५, पाटोदा १६, शिरुर १७ व वडवणी तालुक्यातील ७ जणांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ९० हजार ९४० इतका आहे. यापैकी ८७ हजार २३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, २४ तासात २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात गोलमरवाडी (ता. बीड) येथील ६० वर्षीय महिला व पारगाव घुमरा (ता. पाटोदा) येथील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण बळींचा आकडा दोन हजार ४६२ इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दोघांचा मृत्यू; नवे १४८ रुग्ण तर १०२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST