जिल्ह्यात सोमवारी २,९१७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले. यात १४७ पॉझिटिव्ह तर २७७० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १२, आष्टी २९ , बीड ३१, धारुर ६, गेवराई १३, केज ११, माजलगाव ७, परळी ३, पाटोदा १४, शिरुर १५ व वडवणी तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ९० हजार ७९२ इतका झाला असून, यापैकी ८७ हजार ९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान २४ तासात २ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यात उपळी (ता. वडवणी) येथील ६५ वर्षीय महिला व डोणगाव (ता. केज) येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण बळींचा आकडा २ हजार ४६० इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दोघांचा मृत्यू; नवे १४७ रुग्ण तर १२१ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST