शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे देहावसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 16:59 IST

बीडसह राज्यभरातील वारकरी संप्रदायावर शोककळा

ठळक मुद्देसंत चरित्राचे गाढे अभ्यासक लोकमत.कॉम साठी अध्यात्मिक लेखांची मालिका

बीड : गेल्या चाळीस वर्षापासून देशात सांप्रदायिक आणि नारदीय कीर्तन सेवा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी (वय ५७ वर्षे) यांचे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने देहावसान झाले. भरतबुवांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नात, दोन भाऊ, भावजई आदी परिवार आहे. 

वारकरी सांप्रदायाची पताका गेल्या अनेक वर्षापासून एकनिष्ठपणे सांभाळणाºया भरतबुवांनी बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणचा कीर्तन महोत्सव देशभरात पोहचवला. मागील सोळा वर्षापासून ते या महोत्सवाचे उत्कृष्ट संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. भरतबुवांच्या निधनाने सांप्रदायीक चळवळीची मोठी हानी झाली आहे.

संत चरित्राचे गाढे अभ्यासक असलेले रामदासी यांना शनिवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करु न त्यांना मृत घोषित केले. भरतबुवांच्या अकाली निधनाची वार्ता वाºयासारखी  शहरभर पसरली अनेकांना त्यांच्या निधनाने धक्का बसला. माहिती मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व क्षेत्रातील नागरिकांनी, प्रतिष्ठितांनी गर्दी केली होती. भरतबुवा रामदासी हे मुळचे  रुई धानोरा (ता.गेवराई) येथील रहिवासी असून बीड शहरातील सराफा रोडवरील राममंदिर गल्लीत ते वास्तव्यास होते. गेल्या चाळीस वर्षापासून देशभरात सांप्रदायिक, वारकरी आणि नारदीय कीर्तन सेवा केली आहे. बीडचे नाव सांप्रदायिक चळवळीच्या माध्यमातून देशाच्या पटलावर पोहचवण्यात भरतबुवांचा सिंहाचा वाटा होता.रविवारी सकाळी अंत्यसंस्कार

भरतबुवा रामदासी यांच्या पार्थिवावर 1 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी सराफा लाईन, राम मंदिर गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.

लोकमत.कॉम साठी भरतबुवा लिहायचे अध्यात्मलोकमत आॅनलाईनवर हभप भारतबुवा रामदासी हे नियमित आठवड्याला अध्यात्म या सदरातून समाजप्रबोधन करत असत. अतीशय स्पष्ट, सुलभ भाषेत दाखले देत ते अंधश्रद्धा, वाईट गोष्टीवर घणाघाती लिहित असत. त्यांनी लोकमत आॅनलाईनवर 55 लेख लिहिले. शेवटचा लेख 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला. ते नेहमी दोन लेख अ‍ॅडव्हान्समध्ये देत असत. यावेळी मात्र त्यांनी 22 फेब्रुवारीपर्यंतचाच लेख दिला. त्यांचे लिखाण असो की कीर्तन, प्रवचन, त्यास वाचकवर्ग, श्रोतावर्ग होता. लिखाण आणि वाणीवर त्यांचे प्रभूत्व होते.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडAdhyatmikआध्यात्मिक