शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गोवर-पेन्टा लस दिल्यानंतर दुस-या दिवशी बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:52 IST

परळी शहरातील वडसावित्रीनगरातील एका ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. गोवर-पेन्टा लस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

बीड : परळी शहरातील वडसावित्रीनगरातील एका ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. गोवर-पेन्टा लस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी प्रसंगी फॉरेन्सिक लॅबला नमुने पाठविले जाणार आहेत.शहरातील वडसावित्रीनगर भागातील निकिता नंदू जाधव या ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. ९ महिने आणि दीड वर्षे झालेल्या बालकांना आरोग्य विभागाच्या वतीने गोवर- पेन्टा लस दिली जाते. आरोग्यसेविका आणि आशा स्वयंसेविकांनी वडसावित्रीनगर भागातील अंगणवाडीत शनिवारी संबंधित बालकांना लस दिली होती. रविवारी निकिता हिला ताप आला, अंगावर लाल फोड आले, तिचा मृत्यू हा लस दिल्याने झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी त्यांची समजूत काढत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाई करता येईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी बाळाचे प्रेत अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात नेले. या परिसरातील लक्ष्मी गवळी नामक दीड वर्षाच्या मुलीला लस दिल्यानंतर ताप आला होता, तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच या भागातील ७ बालकांना लस दिलेली आहे, त्यांना मात्र कुठलाही त्रास दिसून आलेला नाही. नातेवाईकांनी केलेला आरोप आणि रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांनी मांडलेली बाजू पाहता शवविच्छेदन अहवालानंतर निकिताच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वेळ पडल्यास फॉरेन्सिक लॅबला नमुने पाठविले जाणार आहेत. त्या अहवालावरच पुढील दिशा ठरणार आहे.निकिता जाधव नामक नऊ महिन्याच्या बाळास गोवर-पेन्टा डोस शनिवारी देण्यात आला होता. तिला दिवसभर त्रास नव्हता. सकाळी देखील त्रास नव्हता. मात्र दूध पिऊन बाळ झोपल्यानंतर साडेनऊच्या सुमारास पालकांनी बाळाला रुग्णालयात आणले ते मृतावस्थेत होते. डोस दिल्यानंतर ३ ते ४ तासात रिअ‍ॅक्शन येते. इतर सात बाळांनाही असाच डोस देण्यात आला होता. त्यांना मात्र कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे निकिताचा मृत्यू लसीकरणामुळे झाला असे प्रथमदर्शनी वाटत नाही.- डॉ. संजय गित्ते, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी

टॅग्स :Deathमृत्यू