जिल्ह्यात शुक्रवारी ४५७९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी दुपारी त्याचे अहवाल प्राप्त झाले. यात १७३ जण बाधित आढळले, तर ४४०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ११, आष्टी ४१, बीड ३०, धारुर १२, गेवराई १३, केज १८, माजलगाव ११, परळी ४, पाटोदा १३, शिरुर १७ व वडवणी तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ९० हजार ३६६ इतका झाला असून, यापैकी ८६ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २४ तासांतील १, तर जुन्या १० अशा एकूण ११ मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये फुलेनगर माजलगाव येथील ४४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकूण बळींचा आकडा २ हजार ४४४ इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
एक मृत्यू; १७३ नवे रुग्ण; १५८ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST