शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हर फ्लो तलावात तरूणांचा जीवघेणा स्टंट; जिव धोक्यात घालून पोहण्यासाठी उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 16:59 IST

Rain In Beed : एखाद्याचा जिव गेला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न या निमित्ताने ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 

- नितीन कांबळे कडा ( बीड ) : सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन मोठमोठे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. अद्यापही पाण्याचा ओघ सुरूच असल्याने नागरिकांनी जिव धोक्यात घालू नये अशा सुचना आपत्ती व्यवस्थापनाने देऊनही काही तरुण ओव्हर फ्लो तलावात पोहण्यासाठी उड्या घेत असल्याचे चित्र दादेगांव येथील कडी तलावात दिसत आहे. हा स्टंट नक्कीच जिवघेणा ठरू शकतो यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यायला अशी मागणी जागरूक ग्रामस्थांनी केली आहे. 

तालुक्यातील अनेक तलाव ओव्हर फ्लो झाल्याने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा दिला आहे. तरी देखील याची कसलीच भिती न बाळगता दादेगांव येथील तलाव भरून वाहत असताना काही तरूणांनी या तलावात आपला जिव धोक्यात पोहण्यासाठी उड्या घेतल्या. उड्या घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तरुणांची ही जीवघेणी स्टंटबाजी जीवावर बेतणारी ठरू शकते. तालुक्यातील बेलगाव येथील तलावाच्या सांडव्यात पडून दोन वर्षांपूर्वी  दोघांचा बळी गेला होता. अशाच प्रकारे एखाद्याचा जिव गेला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न या निमित्ताने ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 

तालुक्यातील ओव्हर फ्लो झालेल्या तलावाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून प्रतिबंधक ठिकाणी जाण्यास मज्जाव करावा तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे. तलाव परिसरातील प्रतिबंधक क्षेत्रात लोकांनी जाऊ नये पाण्याचा ओघ वाढत आहे. आपली काळजी आपणच घ्यायला पाहिजे. यासाठी जनजागृती केली जात असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता देवेंद्र लोहकरे यांनी सांगितले. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक ! बुडणारा मुलगा वाचला; पण त्याला वाचविणारे तिघे बुडाले

तलावावर सुरक्षा व्यवस्था शून्य कडी प्रकल्प भरून वाहत आहे. या ठिकाणी लहु पाटबंधारे विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी असणे बंधनकारक आहे. मात्र, कर्मचाऱ्याचे पद रिक्त असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे तलावाच्या सुरक्षेसाठी व नागरिकांना प्रतिबंध करण्यासाठी कोणीच नसल्याचे दिसून आले.

गावात दवंडी द्यायला लावली असून सांडवा परिसरात गेल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याच बरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तातडीची बैठक तहसील कार्यालयात बोलावली आहे.- प्रदिप पांडुळे, नायब तहसिलदार

हेही वाचा - लक्ष ठेवायला सांगितले अन् त्यानेच केला घात; मुकुंदवाडीत पाच वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड