शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात सोमवार ठरला आंदोलनाचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:21 IST

धनगर समाजाला एसटी आरक्षणाची सरकार अंमलबजावणी करत नसल्याच्या निषेधार्थ माजलगाव धनगर समाज व मल्हार सेनेच्या वतीने निषेध साखळी धरणे आंदोलन येथील उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आली.

ठळक मुद्देआंदोलनाने दणाणले माजलगाव : मल्हार सेनेचे धरणे, शेतकऱ्यांचा रास्ता रोको, फेरफारसाठी शेतकऱ्याचे उपोषण

माजलगाव : धनगर समाजाला एसटी आरक्षणाची सरकार अंमलबजावणी करत नसल्याच्या निषेधार्थ माजलगाव धनगर समाज व मल्हार सेनेच्या वतीने निषेध साखळी धरणे आंदोलन येथील उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आली. तर ऊस बिलातील फरक त्वरित देण्यात यावा, यासाठी भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली परभणी टी पॉर्इंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तर आपल्या जमिनीतील फेर करण्यात यावेत, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शेतकरी कोळसे यांनी उपोषण सुरु केल्याने माजलगावात सोमवार हा दिवस आंदोलन धरणे आणि उपोषणाचा दिवस ठरला आहे.भाजपा-शिवसेना सरकारला सत्तेत येऊन साडेचार वर्षे झाले तरी धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने केली नाही. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई शेळी-मेंढी विकास महामंडळाला ५०० कोटी रु पये देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. समाजाची दिशाभूल करून ७० वर्षांपासून आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवल्यामुळे धनगर समाज अडचणीत सापडला आहे. सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ मल्हार सेनेच्या वतीने येथील विभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तुकाराम येवलेसह इतर कार्यकर्ते सहभागी होते. त्याचप्रमाणे छत्रपती व सुंदरराव सहकारी कारखान्याकडे २०१६-१७ मधील प्रतीटन ६०० रु पये प्रमाणे जो फरक देण्यात आला नव्हता, तो व्याजासह देण्यात यावा. तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी नियमाप्रमाणे ऊस बिल द्यावे, तालुक्यातील परिक्षेत्रातील उसाला गाळपासाठी पूर्ण प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे २०१७-१८ चे २५० रुपयांचा फरक लेखी कबूल करून जय महेशने काही लोकांना अठराशे तर काहींना २ हजार ५०० रु पये भाव देऊन दुजाभाव केला आहे. त्या फरकातील २५० रुपये रक्कम त्वरित देण्यात यावी या व विविध मागण्यांसाठी भाई थावरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रास्ता रोको करण्यात आला.तर आपल्या जमिनीतील फेरफार करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी बंडू कोळसे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन