शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लेकीचे आगमन, सुखाची चाहूल;मुलगी झाल्याच्या आनंदात बापाने घोड्यावरून गावभर जिलेबी वाटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 11:55 IST

मस्साजोग येथील मोरे कुटुंबीयांनी केले कन्याजन्माचे स्वागत; घोड्यावरून वाटली पन्नास किलो जिलेबी

केज : पहिले अपत्य जर मुलगी झाली तर गावात घोड्यावरून जिलेबी वाटण्याचा केलेला संकल्प मस्साजोग येथील मोरे कुटुंबीयांनी अखेर पूर्ण केला. लग्नानंतर चार वर्षांनंतर मुलगी झाल्याचा आनंद घोड्यावरून पन्नास किलो जिलेबी गावातील नागरिकांना वाटून साजरा करत या कुटुंबाने मुलीच्या जन्माचे आगळे स्वागत केले आहे.

तालुक्यातील मस्साजोग येथील बुवासाहेब मोरे यांना दोन मुले असून त्यांचा मुलगा अमरसिंह मोरे याचा विवाह चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील यशोमतीसोबत झाला होता. लग्नानंतर अमरसिंह व यशोमती मोरे यांनी पहिल्या वेळेस मुलगी झाली तर गावात घोड्यावरून जिलेबी वाटण्याचे ठरवले. लग्नाच्या चार वर्षांनंतर अमरसिंह व यशोमती या दाम्पत्यास अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात १८ मार्च रोजी कन्यारत्न झाले. पहिल्या वेळेस कन्यारत्न झाल्याने आनंद गगनात मावेनासा झाला. पहिल्यांदा मुलगी झाल्यानंतर गावात घोड्यावरून जिलेबी वाटण्याच्या केलेल्या संकल्पानुसार मोरे कुटुंबीयांनी गावातील ग्रामस्थांना घोड्यावरून वाजत गाजत जिलेबी वाटली. यावेळी अमरसिंह मोरे यांचे भाऊ प्रीतम मोरे, वडील बुवासाहेब मोरे, चुलते अप्पासाहेब मोरे, भाऊ हिंदुराजे मोरे आदींसह मोरे कुटुंबीय उपस्थित होते. भ्रूण हत्यांचा कलंक लागलेल्या बीड जिल्ह्यात मुलीच्या जन्माचे स्वागत घोड्यावरून जिलेबी वाटून केले जात असल्याने सकारात्मक प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त झाल्या.

मुलगी झाल्यास घोड्यावरून जिलेबी वाटण्याचा केला होता निर्धार - अमरसिंह मोरेलग्न झाल्यानंतर पहिले अपत्य हे मुलगी झाल्यास गावात घोड्यावरून जिलेबी वाटण्याचा निर्धार केला होता. लग्नानंतर चार वर्षांनी तुकाराम बीजेच्या दिवशी १८ मार्च रोजी मुलगी झाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. केलेल्या संकल्पाप्रमाणे २० मार्च रोजी गावात घोड्यावरून जिलेबी वाटून कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केल्याचे अमरसिंह मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिक