शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

छळामुळे सूननं संपवल जीवन; तीन दिवसांपासून गुंगारा देणारी सासू पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:12 IST

पोलिसांनी धामणगाव येथून सासूस ताब्यात घेतले.

- नितीन कांबळेकडा-सासरच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय विवाहितेचा तीन दिवसांनंतर घराजवळील विहीरीत मृतदेह आढळून आल्यानंतर अंभोरा पोलिसांनी पतीसह सासरा आणि दीर यांना अटक केली होती. दरम्यान, तीन दिवसांपासून फरार असलेल्या सासूस पोलिसांनी आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान धामणगाव येथून अटक केली आहे. आशाबाई कल्याण राऊत  (४०) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील माहेर असलेल्या कोमलचा धामणगाव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता.काही वर्ष संसार सुखाचा चालला असताना कोमलला पती,सासरा,सासू,दीर मानसिक त्रास देऊन तिचा छळ करत होते. हा प्रकार सहन न झाल्याने २६ नोव्हेंबर रोजी ती बेपत्ता झाली होती.२९ नोव्हेंबर रोजी तिचा मृतदेह घरालगत असलेल्या राऊत कुटुंबाच्या मालकीच्या विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. 

दरम्यान, मयत कोमलची आई लक्ष्मी जयराम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पती श्रीकांत कल्याण राऊत, सासरा कल्याण विठ्ठल राऊत, सासू आशाबाई कल्याण राऊत, दीर निलेश कल्याण राऊत यांच्याविरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पतीसह सासरा आणि दीर यांना राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. तर सासू फरार होती.

अखेर आज सकाळी सासू आशाबाईस पोलिसांनी धामणगाव येथून ताब्यात घेतले.ही कामगिरी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे पोलिस नाईक सुवर्णा पालवे यांनी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी