शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 05:25 IST

सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा, तर श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे-पाटील यांचा दसरा मेळावा शनिवारी होत आहे. पहिल्यांदाच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ एकत्रित येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा, तर श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा दसरा मेळावा शनिवारी होत आहे. नारायणगडावर पहिल्यांदाच लाखोंच्या संख्येने लोक जमा होणार आहेत, तर सावरगावघाट येथेही पहिल्यांदाच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ एकत्रित येणार आहेत. जरांगेंचा मेळावा मुंडेंसाठी आव्हान असणार आहे. यात कोण काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

सावरगाव घाट या राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगावी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा सुरू केला. त्याची परंपरा आजही कायम आहे. तर आता मनोज जरांगे-पाटील पहिल्यांदाच श्रीक्षेत्र नारायणगडावर दसरा मेळावा घेत आहेत. 

मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर कोण?

मनोज जरांगे- पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. आचारसंहितेच्या अगोदर आरक्षण न दिल्यास उमेदवार पाडणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकसभेलाही त्यांनी नाव न घेता ‘जे आरक्षणाच्या विरोधात त्याला पाडा’, असे विधान केले होते. त्यानंतर याच निवडणूक प्रचारात पंकजा मुंडे यांनी आंदोलनाबाबत विधान केले होते. यावर जरांगेंनी त्यांचा समाचार घेतला होता. याचा फटका पंकजा यांना लोकसभेत बसला व पराभव झाला. त्या निवडणुकीत जातीय राजकारण झाले होते. आता यावेळी जरांगे कोणावर निशाणा साधणार? याकडे लक्ष लागले आहे.

सरसंघचालक काय बोलणार? संघाचा शताब्दी वर्षात प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या स्थापनेला ९९ वर्षे पूर्ण झाली असून, विजयादशमीला शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका व आगामी विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात, याकडे लक्ष असेल.  

टॅग्स :DasaraदसराPankaja Mundeपंकजा मुंडेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील