शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

धस, धोंडे, दरेकर एकत्र राहिल्याने आष्टीत भाजपला मिळाले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:15 IST

बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदार संघातील मतदारांनी परत एकदा भाजपच्या डॉ. प्रीतम यांना कौल देत ७० हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले.

ठळक मुद्देआष्टी विधानसभा मतदार संघ। रस्ते, जलसंधारण, रेल्वे इत्यादी विकास कामाची मिळाली पावती; राकाँच्या आघाडीला मोठा ब्रेक

अविनाश कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदार संघातील मतदारांनी परत एकदा भाजपच्या डॉ. प्रीतम यांना कौल देत ७० हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्टÑवादीचे नेते सुरेश धस यांना भाजपात सामील करुन बीड-लातूर- उस्मानाबाद विधान परिषदेचे आमदार केले. त्यामुळे आष्टी मतदार संघावर भाजपने वर्चस्व निर्माण केले. विशेष म्हणजे ज्या थ्रीडीभोवती मतदार संघाचे राजकारण फिरत राहिले ते आ. सुरेश धस, आ. भिमराव धोंडे, माजी आ. साहेबराव दरेकर या तिघांची शक्ती भाजपला पाठबळ देणारी ठरली. त्यामुळे बजरंग सोनवणे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभा घेत मतदार संघ ढळवून काढला. पूर्ण शक्ती पणाला लावली. परंतू मतदारांनी राष्टÑवादीच्या आघाडीला मोठा ब्रेक लावला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही याच मतदार संघाकडे असल्यामुळे डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासाठी जमेची बाजू ठरली.आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे. अनेक गावांत झालेली रस्त्याची कामे, जलसंधारण व रेल्वे अशी विविध विकास कामे झाली. तर धोंडे, धस या दोन्ही आमदारांनी मतदार संघात विकास कामे खेचून आणण्यात चढाओढ झाली. तसेच जिल्हा परिषद व आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील नगर पंचायत व पंचायत समिती सह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असल्याने त्याचाही लाभ भाजपला या निवडणुकीत झाला.असे झाले मतदानआष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये एकूण ३ लाख ६९ हजार ५३८ मतदार आहेत. तर त्यापैकी २ लाख ४३ हजार ४५५ एकूण मतदान झाले.यापैकी भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना १ लाख ४७ हजार ८४० तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना ७७ हजार ९९७ आणि बहूजन वंचित आघाडीचे विष्णू जाधव यांना ६ हजार ७५७ मते मिळाली.अपक्ष उमेदवारांमध्ये संपत चव्हाण यांना १ हजार १७३, मुजीब इनामदार यांना १ हजार ९९ मते मिळाली. दोघे वगळता ३१ अपक्षांना चार अंकी संख्या गाठता आली नाही.दुरंगी लढतचडॉ. प्रीतम मुंडे यांना २ लाख ४३ हजार ४५५ एकूण मतदान झाले. तर बजरंग सोनवणे यांना ७७ हजार ९९७ एवढे एकूण मतदान झाले. तर आष्टी मतदार संघातून डॉ. प्रीतम मुंडे यांना ७० हजार ३४४ मतांची आघाडी इतर विधानसभा सभा मतदार संघाच्या तुलनेत सर्वाधिक मिळाली.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbeed-pcबीडBJPभाजपा