बीड : चोरी, घरफोड्यांपेक्षाही सायबर भामट्यांनी लुटलेल्या रकमेचा आकडा थरकाप उडवणारा आहे. राज्यात २०२३ ते मे २०२५ या अडीच वर्षात तब्बल ९ हजार ९९ कोटी रुपये भामट्यांनी लुटले आहेत. त्यातील केवळ ६७ कोटी रुपये परत करण्यासह गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. हा टक्का ०.७ टक्के एवढाच आहे. तसेच दाखल १८ हजार २२२पैकी तब्बल १६ हजार ५०६ गुन्हे अजूनही उघड झालेले नाहीत. याचे प्रमाण तब्बल ९१ टक्के आहे. एकीकडे सायबर भामटे सक्रिय होत असताना यंत्रणा मात्र त्यांना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.
१८,२२२ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे१,९५६ आरोपींना अटक
सायबर बुलिंग, ट्रोलिंगचे ९८२ गुन्हेडिजिटल माध्यमांतून त्रास देणे, धमकावणे, बदनामीचे प्रकारही वाढले आहेत. तसेच जाणूनबुजून वादग्रस्त, आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर टिप्पण्या किंवा पोस्टही केल्या जात आहेत. अशा लोकांवर अडीच वर्षांत ९८२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ५५५ उघड झाले असून, ४२७ अजूनही तपासावर आहेत. ४२६ जणांना अटक झाली आहे.
सुशिक्षितच जास्त बळीशिक्षक, प्राध्यापक, पोलिस, अभियंता, डॉक्टर, प्राचार्य असे सुशिक्षित लोकच सायबर भामट्यांच्या आमिषाला आणि भूलथापांना बळी पडले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री?सायबर गुन्ह्यात तपास होण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प हा जागतिक स्तरावरील एक अत्याधुनिक उपक्रम नवी मुंबई, महापे येथील सायबर मुख्यालयात चालू केला आहे. हा प्रकल्प राज्यातील सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे नियंत्रणासाठी अत्याधुनिक केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात व्यक्त केला.
आमिषाला बळी पडू नयेऑनलाइन फसवणूक झाल्यास १९३०ला तातडीने काॅल करावा. नागरिकांनीही आमिषाला बळी न पडता खात्री करूनच आर्थिक व्यवहार करावेत.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड
आर्थिक फसवणुकीची आकडेवारीसन - दाखल गुन्हे - उघड गुन्हे - अटक आरोपी - लुटलेली रक्कम (कोटी) - हस्तगत / गोठवलेली रक्कम (कोटी)२०२३ - ६,५८० - ५३९- ६६० - ५८१.९५ - १०.८०२०२४ - ८,९७४ - ९१० - १००७ - ७६३४.२५ - २१.१२मे २०२५ पर्यंत - २,६६८ - २६७ - २८९ - ८८२.९७ - ३५.६६
सायबर बुलिंग व ट्राेलिंगचे गुन्हेसन - दाखल गुन्हे - उघड गुन्हे - अटक आरोपी२०२३ - ४७५ - २४८ - २०६२०२४ - ३७७ - २३५ - १७१मे २०२५ पर्यंत - १३० - ७२ - ४९