शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचे नाक कापले; माय-लेकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 19:38 IST

crime news अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी घाट येथील रघुनाथ दत्तू फड हा अनैतिक संबंध ठेवण्यासाठी चार-पाच वर्षापासून सातत्याने पिडीतेवर जबरदस्ती करत होता.

ठळक मुद्देपिडीतेच्या नाकाचा शेंडा कापून तिला विद्रूप केले

अंबाजोगाई : अनैतिक संबंधास नकार दिल्याच्या रागातून माय-लेकाने विवाहित महिलेचे अपहरण केले आणि निर्जन ठिकाणी नेऊन वस्तऱ्याने तिचे नाक कापून चेहरा विद्रूप केला. पाच वर्षापूर्वी घडलेल्या या गुन्ह्यात दोषी माय-लेकाला गुरुवारी (दि.२८) अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या. एम.बी.पटवारी यांनी पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.  या घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी घाट येथील रघुनाथ दत्तू फड हा अनैतिक संबंध ठेवण्यासाठी चार-पाच वर्षापासून सातत्याने पिडीतेवर जबरदस्ती करत होता. त्यांच्या धास्तीने पीडिता माहेरी निघून गेली होती. दि. ९ जानेवारी २०१६ रोजी पीडिता तिच्या मुलाला भेटण्यासाठी माहेरहून अंबाजोगाईला येत होती. यावेळी सेलमोहा पाटीवरून रघुनाथ फड आणि त्यांची आई सत्यभामा दत्तू फड या दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून धर्मापुरी येथील सबस्टेशन जवळच्या डोंगरातील झाडीत नेले. तिथे रघुनाथने वस्तऱ्याने पिडीतेच्या नाकाचा शेंडा कापला आणि तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. 

या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून रघुनाथ आणि सत्यभामा या दोघांवर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक आर.एन. चाटे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांच्या न्यायालयासमोर झाली. सरकार पक्षाकडून सात साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. पटवारी यांनी सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून रघुनाथ आणि सत्यभामा फड यांना दोषी ठरविले. पिडीतेच्या नाकाचा शेंडा कापून तिला विद्रूप केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, अपहरण केल्यामुळे तीन वर्षे सक्तमजुरी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.  या प्रकरणात सरकारी पक्षा तर्फे सरकारी वकील रामेश्वर मन्मथअप्पा ढेले यांनी वरिष्ठ सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली काम पहिले. त्यांना ॲड. नितीन पुजदेकर, पो.कॉ. अविनाश गित्ते, पैरवी अधिकारी गोविंद कदम आणि सोड्गीर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगBeedबीड