बीड : तलवारीने वाढदिवसाचा केक कापून घरी निघालेल्या एकास गजाआड करण्यात आले आहे. त्याच्याकडून तलवार जप्त केली असून पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री केली.कृष्णा धर्मराज रणदिवे (२६, रा.बलभीम नगर, पेठ बीड) असे पकडलेल्या तरूणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री पेठबीड पोलीस ठाणे हद्दीत तलवारीने केक कापला जात असल्याची माहिती एलसीबीचे सपोनि अमोल धस यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पेठबीडमध्ये धाव घेतली. मात्र तोपर्यंत कार्यक्रम संपला होता.कृष्णा हा तलवार घेऊन जाताना त्यांना दिसला. तपासणी केली असता तलवारीला केक लागल्याचे आढळून आले. त्यानंतर धस यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडील तलवार जप्त केली.तोतला गिरणीजवळून तो पलायन करण्याच्या आतच त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरोधात आर्म अॅक्टप्रमाणे पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नसीर शेख यांनी याबाबत फिर्याद दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल धस, साजीद पठाण, नसीर शेख, सखाराम पवार, राजू वंजारे आदींनी केली.
तलवारीने केक कापला; तरूणाविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:28 IST
तलवारीने वाढदिवसाचा केक कापून घरी निघालेल्या एकास गजाआड करण्यात आले आहे. त्याच्याकडून तलवार जप्त केली असून पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री केली.
तलवारीने केक कापला; तरूणाविरूद्ध गुन्हा
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : वाढदिवसाचे औचित्य साधून केलेली हौस आली अंगलट