शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वीज नसल्याने पिके धोक्यात, संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 11:53 IST

शेतात सध्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांना पाण्याची गरज आहे.

- नितीन कांबळेकडा (बीड) : टाकळी अमिया, सराटेवडगांव, निमगांव चोभा, रूई नालकोल, नांदा या गावांत गेल्या पाच दिवसांपासून अचानक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पिके धोक्यात आल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी या गावांतील संतप्त शेतकर्‍यांनी आज सकाळी टाकळी अमिया येथील ३३ केव्ही सबस्टेशन येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत निषेध व्यक्त केला.

आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील ३३ के.व्ही. सबस्टेशनमधून  परिसरातील गावांना विद्युत पुरवठा केला जातो. परंतु गेल्या पाच दिवसांपासून महावितरणने अचानक टाकळी अमिया, सराटेवडगांव, निमगांव चोभा, रूई नालकोल, नांदा या गावांतील विद्युत पुरवठा खंडित केला आहे. शेतात सध्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांना पाण्याची गरज आहे. असे असताना वीज नसल्याने पिके धोक्यात आल्याचे पाहून  शेतकरी जेरीस आला आहे. यामुळे परिसरातील संप्तत शेतकऱ्यांनी आज सकाळी टाकळी अमिया येथील सबस्टेशनला घेराव घालत महावितरणच्या  अभियंत्याना धारेवर धरत निषेध व्यक्त केला. आंदोलनात ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. राम बोडखे, डाॅ.शिवाजी शेंडगे, अमोल शितोळे, पिनु चौधरी,सावता ससाणे, मधुकर गिर्हे, अशोक चौधरी, अशोक एकशिंगे, श्रीरंग चौधरी, तात्यासाहेब नालकोल, आजिनाथ नालकोल, पांडुरंग धोंडे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते. 

थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित याबाबत कडा येथील महावितरणचे सहायक अभियंता दत्तात्रय दसपुते यांनी सांगितले की, या परिसरात थकीत वीजबिलाचा आकडा मोठा आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून सबस्टेशनमधून होणार विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

आमचंच खाता आमच्यावर उलटता आता मुबलक पाणी आहे, पेरण्या झाल्या, काही शिल्लक आहेत. पिकाला पाण्याची गरज असताना वीज बंद केली. साहेब आमचचं खाता आणि  आमच्यावर उलटता हे बर नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी शिवाजी भवर यांनी यावेळी दिली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीBeedबीडmahavitaranमहावितरण