शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा कंपनीला मोठा नफा, शेतकऱ्यांना मिळू शकतात हेक्टरी १० हजार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 12:38 IST

राज्य शासनाने मंजुरी दिली तर, मिळणार हेक्टरी १० हजारांची मदत

ठळक मुद्दे‘बीड पॅटर्न’अंतर्गत जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव 

- प्रभात बुडूख

बीड : पीक विम्यासाठीच्या ‘बीड पॅटर्न’ ची राज्यभरात चर्चा झालेली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्रांच्या आधारे पीक विमा कंपनीला मागील हंगामात झालेल्या नफ्यातून सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केल्याची सूत्रांची माहिती आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केल्यास मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी १० हजाराची मदत मिळू शकते.

बीड जिल्ह्यात मागील वर्षी (२०२०-२१ ) तब्बल १७ लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यापोटी शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळून ७९८ कोटी पीक विमा कंपनीला भरला होता. मागील हंगामात कंपनीने केवळ १७ हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली. म्हणजे एका अर्थाने ७८५ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. यातील २० टक्के म्हणजे १६० कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी ६२५ कोटी शिल्लक राहणार आहे. ही रक्कम एका अर्थाने नफा असून, ती रक्कम शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत केली जावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येत आहे. यासंदर्भात अधिकृतपणे बोलण्यास प्रशासनातील अधिकारी तयार नाहीत. मात्र असा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

असा आहे बीड पीक विमा पॅटर्नबीड जिल्ह्यात पीक विमा स्वीकारण्यास खाजगी कंपन्या तयार होत नसल्याने राज्य सरकारने विशेष असा ‘बीड पॅटर्न’ तयार केला होता. त्यानुसार विमा कंपनीला द्यावी लागणारी नुकसान भरपाई ११० टक्के पेक्षा अधिक असेल तर, वरची रक्कम राज्य सरकार देईल आणि सदर नुकसान भरपाई ८० टक्के पेक्षा कमी असेल तर, कंपनीला खर्चापोटी २० टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकार घेईल असा बीड पॅटर्न ठरविण्यात आला होता.

शासनाकडे ६२५.४ कोटी रुपये शिल्लकशेतकरी, राज्य व केंद्र सरकार मिळून विमा कंपनीकडे ७९८. ५८ कोटी रुपये भरणा केला होता. यापैकी २०२० खरीप हंगामात शेतकऱ्यांना १३ कोटी ४७ लाखाची मदत दिली आहे. त्यामुळे शिल्लक रक्कम ७८५. ११ कोटी इतकी असून, बीड पॅटर्ननुसार २० टक्के कंपनी नफा १५९. ७१ कोटी इतका झाला असून, शासनाकडे असलेली शिल्लक रक्कम ६२५.४ कोटी इतकी आहे.

‘लोकमत’ने फोडली होती वाचापीक विमा कंपनीकडे भरण्यात आलेली रक्कम ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा आहे. त्यामुळे झालेला नफा हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरावा अशा स्वरूपाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.

टॅग्स :RainपाऊसCrop Insuranceपीक विमाagricultureशेती